अमृता फडणवीस म्हणतात, 'मी मोठ्या संकटाशी लढायला तयार आहे!' 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या तपासावरून राज्यात जे "ट्विटर वॉर' सुरू झाले आहे. ते काही केल्या संपायचे नाव घेत नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा "सुना है आज समंदर को बडा गुमान आया है, उधर ही ले चलो कश्‍ती जहां तुफान आया है!' असे ट्विट करत विरोधकांना एक प्रकारे "मी मोठ्या संकटाचा सामना करायला तयार आहे,' असेच आव्हान दिले आहे.
Amrita Fadnavis says, 'I am ready to fight a big crisis!'
Amrita Fadnavis says, 'I am ready to fight a big crisis!'

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या तपासावरून राज्यात जे "ट्विटर वॉर' सुरू झाले आहे. ते काही केल्या संपायचे नाव घेत नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा "सुना है आज समंदर को बडा गुमान आया है, उधर ही ले चलो कश्‍ती जहां तुफान आया है!' असे ट्विट करत विरोधकांना एक प्रकारे "मी मोठ्या संकटाचा सामना करायला तयार आहे,' असेच आव्हान दिले आहे. 

सुशांतसिंहच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे देण्याच्या मागणीवरून राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. त्याच वेळी अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावरून "निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी मुंबई सुरक्षित राहिली नाही. मुंबईने माणुसकी सोडली आहे,' असे ट्विट करत मुंबई पोलिसांना लक्ष्य केले होते. 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर देत "काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत, असा संकेत आहे. या प्रकरणी कोणी कोणाकडे बोट दाखवू नये,' अशा शब्दांत टीका केली होती. परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी तर अमृता फडणवीस यांना मुंबई असुरक्षित वाटत असेल तर त्यांनी मुंबई सोडावी, असे आव्हान दिले होते. 

खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिसाचा पावसात भिजत असलेला फोटो ट्‌विट करून अप्रत्यक्षरित्या अमृता फडणवीस यांना उत्तर दिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, "मुंबई पोलिस, तुम्ही बजावत असलेल्या कर्तव्यामुळेच आपली मुंबई आज सुरक्षित आहे. तुमच्या या मानवी मूल्ये जपणाऱ्या सेवाभावास सॅल्यूट,' अशा शब्दांत मुंबई पोलिसांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले होते. 

सिनेअभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही ट्विट करत मुंबई पोलिसांची पाठराखण केली होती. तसेच, सुशांतसिंहची आत्महत्या आणि त्याचा तपास याचे राजकारण करण्यात येऊ नये, असे म्हटले होते. याशिवाय, विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी फडणवीस यांच्या ट्‌विटचा निषेध करत त्यांचा समाचार घेतला होता. 

दरम्यान, संजय राऊत यांच्या "काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत,' या टिकेला अमृता फडणवीस यांनी 'रहते हैं शीषमहलों में जो, वो अवाम से दूरी बनाया करते हैं! मगर हम तो वो शक़्स हैं, जो पत्थरों से घर बनाया करते हैं! भूल गए हैं वो कांच के घरो में रहकर ख़ुद, छुपाएं कुछ छुपता नहीं! हम फरेबियोंको ठोकरों में, और सच को सीने से लगाया करते हैं!' अशा शब्दांत उत्तर दिले होते. 

त्यानंतर त्यांनी पुन्हा 'सुना है आज समंदर को बडा गुमान आया है, उधर ही ले चलो कश्‍ती जहां तुफान आया है!' असे ट्विट करत आपण मोठ्या संकटाशी सामना करायला तयार आहोत, अशा प्रकारचे आव्हानच अमृता फडणवीस यांनी विरोधकांना दिले आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com