पालकमंत्र्यांच्या कालच्या घोषणेनंतर वडेट्टीवारांनी ‘असा’ दिला नागपूरकरांना दिलासा...

मंदिरांबाहेर, दर्ग्यांच्या बाहेर होणाऱ्या गर्दीबाबत लोकांनी स्वतःच जागरूक झाले पाहिजे. कारण थोडे निर्बंध लावण्याची भाषा केली की, लोकांच्या धार्मिक भावना दुखावतात. आपल्या धर्मातील लोकांना तर आपण समजावून सांगू शकतो. पण सर्वात अधिक काळजी घ्यावी लागते, ती इतर धर्मांच्या लोकांची.
पालकमंत्र्यांच्या कालच्या घोषणेनंतर वडेट्टीवारांनी ‘असा’ दिला नागपूरकरांना दिलासा...
Vijay Wadettiwar at press club

नागपूर : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे येत्या ३ दिवसांत नागपूरकर व्यापाऱ्यांशी बोलून प्रतिबंध अधिक कडक केले जातील, असे काल पालकमंत्री नितीन राऊत Guardian Minister Nitin Raut यांनी जाहीर केले. पण निर्बंध कडक करण्यासंबंधी सरकारमध्ये सध्या कुठलीही चर्चा नाही, असे सांगत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार Minister Vijay Wadettiwar यांनी नागपूरकरांना दिलासा दिला. 

येथील प्रेस क्लबमध्ये ‘मिट द प्रेस’मध्ये वडेट्टीवार आज पत्रकारांशी संवाद साधत होते. ते म्हणाले, सद्यःस्थितीत निर्बंधाचा विषय जर, तर वर अवलंबून आहे. कोरोनाची रुग्णसंख्या जी शून्यावर गेली होती, ती आता दोन अंकी आकड्यांत आली आहे. पुणे आणि मुंबईमध्येही रुग्णसंख्या वाढतेय. संख्या अशीच वाढत राहिली तर प्रतिबंध कडक करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. हा निर्णय कॅबिनेट आणि मुख्यमंत्री घेतील. पालकमंत्री नितीन राऊत यांनी काल जे सांगितले, ते मीसुद्धा ऐकले. त्यांनीही म्हटले आहे की, रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागेल. याबाबत त्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असेल किंवा नसेल, याबाबत मात्र मला माहिती नाही. पण आजच्या तारखेत तरी प्रतिबंध लावण्यासंबंधी सरकारमध्ये कुठलीही चर्चा नाही. 

लॉकडाऊन करावा लागला, तर तो निर्णय संपूर्ण राज्यासाठी असेल. कालची महाराष्ट्रातील कोरोनाची रुग्णसंख्या ३,५०० आहे, ती आधी म्हणजे काही दिवसांपूर्वी केवळ ६०० ते ७०० होती. त्यामुळे हा आकडा वाढू नये, यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करीत आहे. जनतेनेही साध देणे गरजेचे आहे. कारण तज्ज्ञांच्या मते तिसरी लाट येणार आहे. त्यामुळे राज्य सरकार सावध पावले टाकत आहे. कदाचित रुग्णांची गेल्या काही दिवसांत वाढलेली संख्या त्याचेच लक्षणं असावे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची सरकारची तयारी आहे. आता कोणत्याही जिल्ह्यात ऑक्सिजन आणि बेड्सची कमतरता नाही. दुसऱ्या लाटेत नियोजनाच्या अभावाचा फटका बसलेला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत तसे होऊ देणार नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. 

मंदिरांबाहेर, दर्ग्यांच्या बाहेर होणाऱ्या गर्दीबाबत लोकांनी स्वतःच जागरूक झाले पाहिजे. कारण थोडे निर्बंध लावण्याची भाषा केली की, लोकांच्या धार्मिक भावना दुखावतात. आपल्या धर्मातील लोकांना तर आपण समजावून सांगू शकतो. पण सर्वात अधिक काळजी घ्यावी लागते, ती इतर धर्मांच्या लोकांची. कारण इतर लोकच जास्त दुखावतात. त्यामुळे लोकांनी निर्बंध लावण्याची वेळच आणू नये आणि आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्याच्या सुरक्षेची काळजी स्वतः घ्यावी, असे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.