सी-६० च्या जवानांची कमाल, नक्षल्यांचा मोडला कणा, १३ ठार...

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी नक्षलविरोधी मोहिम उघडली आहे. यापूर्वी केलेल्या कारवाईतही पोलिसांना मोठे यश मिळाले होते. काहि दिवसांपूर्वीच नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलिस स्टेशनवर हल्ला केला होता. पण ग्रॅनाईटचा स्फोट न झाल्यामुळे तेव्हा हानी झाली नाही.
Naksal Gadchiroli
Naksal Gadchiroli

चंद्रपूर : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीच्या पयडी-कोटमी जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चममक उडाली. यामध्ये १३ नक्षलवादी मारले गेले. डिआयजी संदीप पाटील यांनी ही माहिती दिली. सी-६० दलाने केलेल्या या कारवाईला हे मोठे यश मिळाले आहे. मृतांचा १६ पर्यंत वाढण्याचीही शक्यता वर्तविली गेली आहे. 

चकमकीत मारल्या गेलेल्या ८ नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतल्याचेही सांगण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींचीही संख्या मोठी आहे. पण यासंदर्भात अधिकृत माहिती मिळू शकली नाही. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त केले आहे. मृतांच्या व्यतिरिक्त काही नक्षलवादी जखमी झाले आहेत, पण त्यांचा आकडा समजू शकला नाही. 

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी नक्षलविरोधी मोहिम उघडली आहे. यापूर्वी केलेल्या कारवाईतही पोलिसांना मोठे यश मिळाले होते. काहि दिवसांपूर्वीच नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलिस स्टेशनवर हल्ला केला होता. पण ग्रॅनाईटचा स्फोट न झाल्यामुळे तेव्हा हानी झाली नाही. तरीही पोलिस स्टेशनवर हल्ला करणे हे गंभीर आहे आणि पोलिसांनी त्याची दखल घेऊन कारवाई सुरू केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com