डाॅ. हिना गावितांना भाजपची बाजू मांडण्याची राष्ट्रीय जबाबदारी - heena gavit appointed as National spokeperson of BJP | Politics Marathi News - Sarkarnama

डाॅ. हिना गावितांना भाजपची बाजू मांडण्याची राष्ट्रीय जबाबदारी

कैलास शिंदे
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

तरुण नेत्यांना संधी देण्याचा भाजपचा प्रयत्न 

जळगाव : महाराष्ट्रात नंदुरबार लोकसभा मतदारसंघात ज्या वेळी भाजपचा खासदार निवडून येईल त्यावेळीं देशात भाजपची बहुमताने सत्ता येईल असे म्हटले जात होते आणि २०१४ मध्ये भाजपच्या हिना गावित या मतदारसंघातून निवडून आल्या आणि खरोखर देशात भाजपच्या बहुमताची सत्ता देशात आली. त्याच हिना गावित यांना आता भाजपने राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड केली आहे.

देशाला स्वतंत्र मिळाल्यापासून तब्बल 60 वर्षे नंदुरबार मतदार संघ काँग्रेसकडे होता. मात्र २०१४ मध्ये भाजपने या मतदार सघात हिना गावित यांच्या मधमातून विजय मिळविला. हिना गावित या मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या. त्यांचे वडील विजयकुमार गावित हे काँग्रस आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते आमदार झाले. त्यानंतर नंदुरबार लोकसभा मतदार संघातून त्यांच्या कन्या डॉक्टर हिना गावित निवडून आल्या. त्यानंतर नुकत्याच २०१९मध्ये झालेल्या निवडणुकीतही त्यांनी यश मिळवले. हिना गावित या डॉक्टर आहेत. त्यांनी दंतआरोग्य विषयात एम.डी. केले आहे.

नंदुरबार मतदारसंघ काँग्रेससाठी महत्त्वाचा होता. कॉंग्रेसचे तत्कालीन खासदार माणिकराव गावित हे राष्ट्रीय कार्यकारणी कायम होते. आता भाजपनेही तोच कित्ता गिरवत नंदुरबारकडे लक्ष दिले आहे.हिना गावित यांची राजकीय सुरवात खासदार सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी युवती संघटेनुत झाली आहे. गावित यांना दोन वेळा उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कारही मिळाला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख