मनसेने साताऱ्यात केले औरंगाबाद एसटीचे 'संभाजीनगर' नामकरण

राहूल पवार म्हणाले,गेल्या ३२ वर्षांपासून शिवसेनेने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आम्ही करू. या एकाच मुद्दयावर संभाजीनगरच्या जनतेसोबत कायम भावनिक राजकारण करून जनतेचा विश्वासघात करत सत्ता मिळवली. आज शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असून देखील छत्रपती संभाजीनगर हे नामकरण करू शकलेले नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे.
Sambhajinagar plaque on Satara-Aurangabad ST; Maharashtra Navnirman Sena aggressive in Satara
Sambhajinagar plaque on Satara-Aurangabad ST; Maharashtra Navnirman Sena aggressive in Satara

सातारा : साताऱ्यात मुख्य बसस्थानकात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज सातारा एसटी डेपोतून औरंगाबादकडे जाणाऱ्या प्रत्येक एसटी बसवर छत्रपती संभाजीनगर हा फलक लावूनच रवाना करावी, अशी आग्रही भूमिका घेत आंदोलन केले. त्यांनी एसटी बसचा फलक बदलून तो सातारा-संभाजीनगर केला. तसेच यापुढे औरंगाबादला जाणाऱ्या सर्व बसचा फलक संभाजीनगर करावा अन्यथा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तो फलक बदलून एसटी बसेस रवाना करेल, असा आक्रमक पवित्रा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतला. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने 
पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सातारा बसस्थानकावर मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सातारा-औरंगाबाद बसला संभाजीनगर फलक लावण्यात यावा, यासाठी आंदोलन केले. मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, ॲड. विकास पवार, जिल्हा सचिव राजेंद्र केंजळे, सातारा शहराध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली  आंदोलन झाले. 

राहूल पवार म्हणाले, गेल्या ३२ वर्षांपासून शिवसेनेने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आम्ही करू. या एकाच मुद्दयावर संभाजीनगरच्या जनतेसोबत कायम भावनिक राजकारण करून जनतेचा विश्वासघात करत सत्ता मिळवली. आज शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असून देखील छत्रपती संभाजीनगर हे नामांतरण करू शकलेले नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे. 

मनसेने हा मुद्दा आक्रमकपणे हाती घेतला असून साताऱ्यात मुख्य बसस्थानकात मनसेच्या कार्यकर्त्यांनी सातारा एसटी डेपोतून औरंगाबादकडे जाणाऱ्या प्रत्येक एसटी बसवर छत्रपती संभाजीनगर हा फलक लावूनच रवाना करावी. अन्यथा, मनसेचे कार्यकर्ते तो फलक लावून एसटी बसेस रवाना करेल, असा आक्रमक पवित्रा श्री. पवार यांनी घेतला. 

राजेंद्र केंजळे म्हणाले, औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण व्हावे, हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. गेली अनेक वर्षे मनपामध्ये सेनेची सत्ता असून आज मुख्यमंत्री सेनेचा असून नामांतराचे विधेयक पारित केलेले असून देखील या नामांतरणाला वेळ लागत आहे. यासाठी आज मनसेने 'आरपार'ची लढाई रस्त्यावर उतरून लढायला सुरुवात केली आहे. मनसेच छत्रपती संभाजीनगर असे नामांतरण करणार आहे. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

या आंदोलनात महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सोनाली शिंदे, मनसे महाबळेश्वर तालुका अध्यक्ष राजेंद्र (आप्पा) बावळेकर, सागर बर्गे, अविनाश दुर्गावळे, संजय गायकवाड, समीर गोळे,  शिवाजी कासुरडे, निखिल कुलकर्णी, प्रतिक माने, विनय गुजर, रोहित शिंगरे, श्याम बावळेकर, दिनेश धनावडे,  राणीताई शिंगरे,  सोनाली कांबळे, शुभम विधाते, अमर  महामुलकर, सुयोग जाधव, सुजीत पवार, संजय शिर्के, संजय सोनावणे, 
मयुर नळ, भरत रावळ, वैभव वेळापुरे, दिलीप सोडमिसे, अझहर शेख, गणेश पवार, चैतन्य जोशी आदी सहभागी झाले होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com