गोपीचंद पडळकरांना साताऱ्यात फिरकू देणार नाही : तेजस शिंदे - Gopichand Padalkar will not be allowed to roam in Satara Says Tejas Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

गोपीचंद पडळकरांना साताऱ्यात फिरकू देणार नाही : तेजस शिंदे

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 24 जून 2020

शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने त्यांच्यावर टीका करावी हे हसण्यासारखं आहे. केवळ प्रसिद्धीच्या वर्तुळात राहण्याचा हा असहाय्य प्रयत्न आहे.

सातारा : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांनी पडळकरांचा तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच गोपीचंद पडळकर यांना भविष्यात सातारा जिल्ह्यात फिरकू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार पडळकर यांचा तीव्र शब्दात निषेध केला. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात तेजस शिंदे यांनी म्हटले की, शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने त्यांच्यावर टीका करावी हे हसण्यासारखं आहे. केवळ प्रसिद्धीच्या वर्तुळात राहण्याचा हा असहाय्य प्रयत्न आहे.

हेही वाचा : पडळकरांच्या तोंडाला काळे फासण्याचा आणि चोप देण्याचा राष्ट्रवादीचा इशारा

जो माणूस कालपर्यंत मोदींना शिव्या देत होता, त्यांच्याकडूनच उमेदवारी घेऊन आमदार होतो. असे अनेक गोपीचंद महाराष्ट्रात झाले आहेत. पवारांच्या उंचीलाही ते स्पर्श करु शकत नाहीत. शरद पवारांवर बोलताना जी भाषा त्यांनी वापरली आहे, त्याचा आम्ही सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवकच्या वतीने तीव्र निषेध करतो.

आवश्य वाचा ः शरद पवारांबद्दल बोलताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली

तसेच त्यांना भविष्यात सातारा जिल्ह्यात फिरकू देणार नाही, असा इशारा तेजस शिंदे यांनी दिला आहे. तसेच त्यांच्याविरोधात सातारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख