अनिल बाबर यांना मंत्रीपद द्या; युवा शिवसेनेच्या मेळाव्यात मागणी - Give ministerial post to Anil Babar; Demand in the youth Shivsena rally | Politics Marathi News - Sarkarnama

अनिल बाबर यांना मंत्रीपद द्या; युवा शिवसेनेच्या मेळाव्यात मागणी

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 12 मार्च 2021

 आमदार बाबर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपदाची संधी द्यावी. त्यांच्या कामाचा आणि अनुभवाचा पक्षवाढीसाठी उपयोग होईल, अशी मागणी युवा तालुकाप्रमुख संतोष पुजारी यांनी बैठकीत वरिष्ठांकडे नोंदवली.त्यासाठी पक्षप्रमुख यांच्याकडे भेट घेऊन मागणी करण्याचा निर्णय घेतला.

आटपाडी : खानापूर विधानसभा मतदारसंघाचे चौथ्यांदा प्रतिनिधीत्व करणारे आणि सलग दुसऱ्यांदा शिवसेनेतून निवडून आलेले आमदार अनिल बाबर यांना त्यांचे काम आणि अनुभव पाहून पक्षवाढीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्रीपद द्यावे, अशी एकमुखी मागणी आटपाडीत झालेल्या युवा शिवसेनेच्या मेळाव्यात करण्यात आली.

आटपाडी येथील शासकीय विश्रामगृहावर विस्तार प्रमुख किरण सावंत आणि शिवसेना युवा जिल्हा प्रमुख मिलिंद कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आटपाडी तालुका युवा शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. स्वागत आणि प्रास्ताविक संतोष पुजारी यांनी केले.

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख साहेबराव पाटील, माजी तालुकाप्रमुख सुभाष जगताप, मारुती मगर, मिरजेचे धैर्यशील मोरे, कल्याण काळे,सरपंच अनिल मुढे आदी उपस्थित होते. आमदार बाबर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपदाची संधी द्यावी. त्यांच्या कामाचा आणि अनुभवाचा पक्षवाढीसाठी उपयोग होईल, अशी मागणी युवा तालुकाप्रमुख संतोष पुजारी यांनी बैठकीत वरिष्ठांकडे नोंदवली.

त्यासाठी पक्षप्रमुख यांच्याकडे भेट घेऊन मागणी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी आबा आईवळे, रामराव पाटील, वसंत अर्जुन, सर्जेराव मासाळ, दादा कोळेकर, प्रदीप पाटील, अमोल सरगर यांचे मनोगत झाले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख