नोकरीच्या आमिषातून तरुणांना एक कोटींचा गंडा  - Deceived young people with the lure of a job | Politics Marathi News - Sarkarnama

नोकरीच्या आमिषातून तरुणांना एक कोटींचा गंडा 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, माण, जावळी, कऱ्हाड, पाटण या तालुक्‍यांतील बेरोजगार तरुण, तरुणींना नौदल, आर्मी, ओएनजीसी तसेच बॅंकेत नोकरी लावतो, असे आमिष संशयितांनी दाखवले होते. या तरुणांना त्यांनी कोलकाता येथे नेऊन बनावट नियुक्तिपत्र दिले. त्यानंतर त्यांच्याकडून प्रत्येकी तीन ते पाच लाख रक्कम स्वीकारली. अशी सुमारे एक कोटींची रक्कम या युवकांकडून त्यांनी उकळली.

सातारा : बेरोजगार तरुणांना नौदल, आर्मी, ओएनजीसी तसेच बॅंकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एक कोटींची फसवणूक करून वर्षाभरापूर्वी पसार झालेल्या दोघांना बोरगांव पोलिस आणि सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या पथकाने अटक केली. नीलेश महादेव कोकणी (दहिवडी, ता. माण), सचिन केपन्ना तरपदार (वय 34, रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. 

जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, माण, जावळी, कऱ्हाड, पाटण या तालुक्‍यांतील बेरोजगार तरुण, तरुणींना नौदल, आर्मी, ओएनजीसी तसेच बॅंकेत नोकरी लावतो, असे आमिष संशयितांनी दाखवले होते. या तरुणांना त्यांनी कोलकाता येथे नेऊन बनावट नियुक्तिपत्र दिले. त्यानंतर त्यांच्याकडून प्रत्येकी तीन ते पाच लाख रक्कम स्वीकारली. अशी सुमारे एक कोटींची रक्कम या युवकांकडून त्यांनी उकळली.

फसवणूक झालेल्या युवकांनी मागील वर्षी बोरगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी काही संशयितांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपत्रही दाखल केले होते. परंतु, हे दोघे पसार होते. दरम्यान, कोकणी हा दोन दिवसांपूर्वी दहिवडीत आला असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांना मिळाली.

त्यानंतर त्यांनी आपल्या टीमसह दहिवडी गाठले. तेथे सापळा रचून कोकणीला अटक केली. दुसरा संशयित सचिन हा पनवेल येथे असल्याची माहिती शेख यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने तेथे जाऊन तरपदारला अटक केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख