'फेसाटी'कार नवनाथ गोरेंना भारती विद्यापीठ देणार नोकरी; विश्‍वजित कदम यांची ग्वाही 

एक उत्तम दर्जाचे पुस्तक जन्माला घातलेला लेखक शेतमजुरी करतोय ही बातमी आल्यानंतर तीमहाराष्ट्रभर साहित्य वर्तुळात चर्चेचा विषय बनली. अनेकांनी नवनाथ यांचा संपर्क मिळवून मदतीसाठी हात पुढे केला.भारती विद्यापीठाचे कार्यवाह, कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांनी तत्काळ या लेखकाला भारती विद्यापीठात नोकरी देण्याची ग्वाही दिली.
Vishwajeet Kadam Assures Job to writer Navanath Gore
Vishwajeet Kadam Assures Job to writer Navanath Gore

सांगली : एक उत्तम दर्जाचे पुस्तक जन्माला घातलेला लेखक शेतमजुरी करतोय, या 'सकाळ'मधील बातमीने आज राज्यातील संवेदनशील, साहित्यप्रिय माणसाला वेदना झाल्या. त्यांनी या लेखकासाठी मदतीचा हात पुढे केला. 'मला उचलून पैसे नको आहेत, मला नोकरी हवीय', असे सांगत नवनाथ गोरे नावाच्या या लेखकाने 'मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा'चे दर्शन घडवले. भारती विद्यापीठाचे कार्यवाह, कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांनी तत्काळ या लेखकाला भारती विद्यापीठात नोकरी देण्याची ग्वाही दिली. 

निगडी बुद्रुक (ता. जत) येथील नवनाथ गोरे हे एम. ए. बीएड झालेले उच्चशिक्षित तरुण. त्यांनी स्वतःच्या जीवनप्रवासाची शब्दमाळ गुंफली आणि 'फेसाटी' नावाने ती पुस्तक रूपाने जन्माला घातली. त्यांच्या या पहिल्याच पुस्तकाने छाप उमटवत साहित्य अकादमीचा युवा साहित्यिक पुरस्कार जिंकला. हा पुरस्कार खूप मानाचा समजला जातो. शिरपेचातील तुरा... पण या तुऱ्यापलीकडे नवनाथ यांचे हात रिकामेच. भाकरीसाठीचा संघर्ष. तो काही चुकला नाही. त्यांना पुरस्कार मिळाल्यानंतर काही ठिकाणाहून मदत मिळाली, नगरमध्ये हंगामी नोकरीही मिळाली, मात्र कोरोनाने ती गेली. संकट गडद झाले. हातातोंडाची गाठ पडेना झाल्यावर नवनाथ यांनी शेतमजुरी सुरू केली. 

ही धक्कादायक, वेदनादायक बातमी "सकाळ'ने  प्रसिद्ध केली. ती महाराष्ट्रभर साहित्य वर्तुळात चर्चेचा विषय बनली. अनेकांनी नवनाथ यांचा संपर्क मिळवून मदतीसाठी हात पुढे केला. त्यावेळी नवनाथ यांनी, 'मी घर चालवतोय, चाललंय माझं ठीक. मला असे उचलून पैसे नकोत, ते काही कडेला जाणार नाहीत. मला नोकरी हवी आहे. ती मिळाली तर बरी होईल', अशी विनंती केली. खानदेश विचार मंचने मदत देण्याची घोषणा केली आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांचे कार्यकर्ते भरीव मदत करणार आहेत. त्यांना हवीय ती नोकरी भारती विद्यापीठाने देण्याचे ठरवले आहे. जतचे आमदार विक्रम सावंत यांनी या विषयावर विश्‍वजित कदम यांच्याशी चर्चा केली. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले.

महाराष्ट्रातील कोणत्याही क्षेत्रातील गुणवंत परिस्थितीने रंजला, गांजला असेल, तर त्याला हात देऊन उभे करण्याचे काम डॉ. पतंगराव कदम यांनी केले. तोच वारसा आणि तीच परंपरा आम्ही चालवतोय. नवनाथ गोरे यांना भारती विद्यापीठात हक्काची नोकरी आम्ही देऊच, शिवाय ते लिहिते राहावेत, यासाठीही पाठबळ देऊ - विश्‍वजित कदम, कार्यवाह, भारती विद्यापीठ

Edited By- Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com