मुलाच्या लग्नाचा निधी कोरोनासाठी वापरण्याचा आमदार गायकवाडांचा निर्णय़ - MLA Ganpat Gaykwad decides to spend marriage money to fight corona | Politics Marathi News - Sarkarnama

मुलाच्या लग्नाचा निधी कोरोनासाठी वापरण्याचा आमदार गायकवाडांचा निर्णय़

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 25 एप्रिल 2021

स्वतः लस नंतर टोचून घेणार... 

कल्याण : आधी कल्याण पूर्व मतदारसंघातली जनतेला लस देणार,मगच मी घेणार. तसेच मुलाच्या लग्नाचा खर्च हा जनतेच्या लसीकरणासाठी करणार आहे, अशी घोषणा कल्याण पूर्व मतदारसंघातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केली. या आधी हिंगोलीतील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी रेमडिसिविह इंजेक्शनसाठी बॅंकेतील 80 लाख रुपयांची ठेव मोडण्याचा निर्णय घेतला होता व ते पैसे रेमडिसिविर इंजेक्शन आणण्यासाठी वितरकाला दिले होते.

राज्यातील वाढत्या कोरोनाचा धोका ओळखून आमदार गणपत गायकवाड यांनी आमदार निधीतून एक कोटी रुपये  ऑक्सीजन प्लांट उभा करण्यासाठी दिले आहेत.  आमदार गायकवाड यांच्या मुलाचे लग्न लवकरच होणार आहे. हा लग्न सोगळा साधेपणाने करणार असून लग्नासाठी होणारा खर्च नागरीकांच्या लसीकरणासाठी करण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

गायकवाड यांच्या मुलाचे 4 मे रोजी लग्न होणार आहे. या लग्नासाठी काही महिन्यापासून गायकवाड कुटुंबियांनी तयारी सुरु केली होती. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढल्याने मुलाचे लग्न अत्यंत साधेपणा करण्याचा निर्णय गायकवाडांनी घेतला आहे. या लग्नासाठी जो खर्च येणार होता, ते सगळे पैसे विधानसभा मतदार संघातील नागरीकांच्या लसीकरण मोहिमेसाठी खर्च केले जातील, अशी घोषणा आमदार गायकवाड यांनी केली आहे. 1500 नागरिकांना स्वखर्चातून लस उपलब्ध करून देण्याचा निर्धार गायकवाड यांनी केला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख