पेन, सही आणि शिक्काही तुमचा, मग संभाजीगनर करायला अडचण काय? मनसे आक्रमक होणार.. - Your pen, signature and seal too, so what's the problem with Sambhajiganar? MNS will be aggressive | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

पेन, सही आणि शिक्काही तुमचा, मग संभाजीगनर करायला अडचण काय? मनसे आक्रमक होणार..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 24 जानेवारी 2021

संभाजीनगर हा कुणासाठी राजकारणाचा मुद्दा असेल, पण मनसेसाठी तो अस्मितेचा मुद्दा आहे. वर्षानुवर्ष सत्ता भोगलेल्या आणि आता राज्याची सत्ता आणि मुख्यमंत्री पद असतांना देखील शिवसेनेला बाळासाहेबांनी या शहराला देिलेले संभाजीनगर हे नाव अधिकृत करता येत नसेल तर यासारखे दुसरे दुर्दैव नाही.

औरंगाबाद ः राज्याच्या सत्तेत शिवसेना आहे, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आहेत, म्हणजेच पेनही तुमचा, सहीही तुमची आणि शिक्काही तुमचाचा. मग औरंगाबादचे संभाजीनगर करण्यात अडचण काय? तुम्ही, तुमचे नेते संभाजीनगर म्हणत असले तरी ते अधिकृत कधी होणार? असा सवाल करत मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी संभाजीनगरच्या मागणीवरून मनसे अधिक आक्रमकपणे आंदोलन करणार असल्याचे `सरकारनामा`शी बोलातांना सांगितले.

येत्या प्रजासत्ताक दिनापर्यंत औरंगाबादचे संभाजीगनर करा, नाही तर, असा इशारा देणारे फलक मनसेने शहरात लावले होते. टीव्ही सेटंर येथे देखील डीजिटल बोर्ड लावून या अल्टीमेटमची आठवण गेल्या काही दिवासांपासून मनसेकडून करून दिली जात आहे. नुकतीच विभागीय आयुक्तांची भेट घेऊन त्यांना औरंगाबादचे संभाजीनगर करा, अशी मागणी देखील मनसेने केली आहे.

महापालिकेत गेली अनेक वर्ष सत्तेत असलेले शिवसेना- भाजप यांच्याकडून संभाजीनगरचा मुद्दा पुढे केला जात असतांना मनसेने देखील त्यात उडी घेतली आहे. उलट शिवसेना- भाजप यांच्यापेक्षा अधिक जोर मनसेने संभाजीगरसाठी लावल्याचे त्यांच्या आंदोनल आणि भूमिकेवरून दिसून आले आहे. २६ जाेवारीची डेडलाईन दिल्यामुळे आता पुढे काय? असा प्रश्न सहाजिकच पुढे येत आहे.

या संदर्भात मनसेचे शहर-जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली. पोलीसांना हाताशी धरून सत्ताधारी शिवसेना दडपशाही करत आहे. आम्ही संभाजीनगरसाठी दिलेली डेडलाईन, त्याचे बोर्ड पोलीसांकडून जप्त करण्यात आले आहे. संभाजीनगर हा कुणासाठी राजकारणाचा मुद्दा असेल, पण मनसेसाठी तो अस्मितेचा मुद्दा आहे. वर्षानुवर्ष सत्ता भोगलेल्या आणि आता राज्याची सत्ता आणि मुख्यमंत्री पद असतांना देखील शिवसेनेला बाळासाहेबांनी या शहराला देिलेले संभाजीनगर हे नाव अधिकृत करता येत नसेल तर यासारखे दुसरे दुर्दैव नाही.

शिवसेना ज्यांच्यासोबत सत्तेत आहे त्या काॅंग्रेसने संभाजीनगरला आमचा विरोध असल्याचे निक्षून सांगितले आहे. त्यानंतर शिवसेना काय करते हे आम्हाला पहायचे आहे. मनसेने या मुद्यावरून राजकारण नाही, तर अनेक वर्षांपासून असलेली जनभावना समोर तीव्रपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यभरात आम्ही बसेसवर संभाजीनगरचे स्टीकर लावून आंदोलनाला सुरूवात केली. आता प्रजासत्ताक दिनापर्यंत संभाजीनगरच्या नावावर शिक्कामोर्तब करा, अशी डेडलाईन देखील आम्ही दिली आहे.

पण सरकारकडून काही ही मागणी पुर्ण होईल असे दिसत नाही, त्यामुळे आता मनसे अधिक आक्रमपणे रस्त्यावर उतरून आंदोनल करेल. या आंदोलनाचे राज्यभर पोहचले तर त्याला जबाबदार सत्ताधारी असतील असा इशारा देखील दाशरथे यांनी दिला आहे. मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे, शहराचे नाव संभाजीनगर झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. शिवसेनेचे नेते संभाजीनगर असा उल्लेख करत असले तरी त्यांनी आता यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब केले पाहिजे.

शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी म्हणजेच २३ जानेवारी राेजी या शहराचे नामकरण संभाजीनगर असे करून हिंदू जनतेला भेट द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. पण ती देखील मान्य करण्यात आलेली नाही. त्यामुळे शिवसेनेला खरंच या शहराचे नामकरण संभाजीनगर करायचे आहे, की फक्त राजकारण हे दिसून येते, असा टोला देखील दाशरथे यांनी लगावला आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख