यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्येच; महामंडळाची घोषणा

नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण आल्यानंतर नुकतीच महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक येथे जाऊन संमेलनस्थळासाठी काही जागांची पाहणी देखील केली होती. त्यानूसार आज नाशिकच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर हे संमेलन होणार आहे.
94 th Akhil Bhartiya Sahitya Samelan now in Nashik news
94 th Akhil Bhartiya Sahitya Samelan now in Nashik news

औरंगाबाद ः अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे यंदाचे साहित्य संमेलन कुठे होणार? दिल्ली की नाशिक याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून साहित्य क्षेत्रात सुरू होती. अखेर ९४ वे  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्येच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस हे संमेलन होणार असल्याची घोषणा औरंगाबादेत झालेल्या पत्रकार परिषदेत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली. संमेलनाच्या तारखा नंतर जाहिर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

९४व्या साहित्य संमेलनासाठी नाशिक, सेलू , पुणे आणि अमंळनेरमधून महामंडळाकडे निमंत्रणे आली होती. शिवाय दिल्लीतून देखील निमंत्रण प्राप्त झाले होते. परंतु कोरोना आणि दिल्ली भागात सुरू असलेले शेतकरी आंदोलन पाहता महामंडळाने या निमंत्रणाचा स्वीकार केला नसल्याची चर्चा होती. २०२०-२१ चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्येच होणार अशी चर्चा देखील काही दिवसांपासून सुरू होती.

नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण आल्यानंतर नुकतीच महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक येथे जाऊन संमेलनस्थळासाठी काही जागांची पाहणी देखील केली होती. त्यानूसार आज नाशिकच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर हे संमेलन होणार आहे. साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका २४ जानेवारी रोजी नाशिकमध्ये होणाऱ्या बैठकीत अंतिम केली जाणार आहे.

अध्यक्ष निवड २४ जानेवारीला..

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या निवडीसाठी नाशिकमध्ये २४ जानेवारी रोजी समितीची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, किंवा नव्या अध्यक्षांची घोषणा केली जाईल, असेही ठाले पाटील यांनी स्पष्ट केले. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून साहित्य महामंडळाचे कार्यक्रम ठप्प झाले होते. कुठलेच उपक्रम या काळात घेता आले नाही. परंतु आता राज्यातील कोरोनाची परिस्थीती आटोक्यात आहे. त्यामुळे साहित्य मंडळाने कामाला सुरूवात केली आहे. त्यानूसार नाशिकला यंदाचे साहित्य संमेलन नाशिकला घेण्याचा निर्णय झाल्याचे ठोले पाटील यांनी सांगितले.

गेल्या वर्षी ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये पार पडले होते.  गेल्या आठ वर्षांपासून मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेतर्फे मराठवाड्यात साहित्य संमेलन घेतलं जावं अशी मागणी होत होती.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com