मेडीकल काॅलेजचा ठराव डीपीडीसीत घेऊन सरकारला पाठवू, लवकरच प्रश्न मार्गी लागेल..

माजी आमदार डॉ. विजय गव्हाणे म्हणाले, गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीची मागणी शासन दरबारी रेटून धरत आहोत. परभणीने सर्व निकष पूर्ण केलेले असतांनाही महाविद्यालयास अद्यापही मंजुरी मिळत नाही.
 minister Nawab Malik news parbhani
minister Nawab Malik news parbhani

परभणी ः 'उद्या होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, हा ठराव घेऊन तो शासनाकडे पाठवून निश्चितपणे शिफारस करणार आहोत. उस्मानाबादला महाविद्यालय मंजुर झाल्याने परभणीकरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तो आधी दूर करावा, कारण परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करण्यासंदर्भात अनेक वेळा मंत्रीमडंळाच्या बैठकीत चर्चा झालेली आहे. त्यामुळे लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे, असे आश्वासन पालकमंत्री नवाब मलिक यांनी परभणीकरांना दिले.

परभणीकरांचा पाहू नका अंत.. वैद्यकीय महाविद्यालय द्यावे तुरंत यासारख्या परिणामकारक घोषणांनी रविवारी (ता.२४ ) जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणुन गेला. परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करावे या मागणीसाठी परभणीकर संघर्ष समितीच्यावतीने जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

परभणीकर संघर्ष समितीचे निमंत्रक खासदार फौजिया खान व माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार मेघना बोर्डीकर, डॉ. रत्नाकर गुट्टे, माजी महापौर प्रताप देशमुख, माजी खासदार अॅड. गणेश दुधगावकर, स्वराजसिंह परिहार, तहसिन अहेमद खान, रविराज देशमुख, सुभाष जावळे पाटील, सुरेश भुमरे, रामेश्वर शिंदे, गणपत भिसे, डॉ. अनिल कान्हे, डॉ. संजय खिल्लारे, राजेश बालटकर, विष्णू सायगुंडे आदी सहभागी झाले होते.

यावेळी विविध नेत्यांच्या भाषणातून परभणीला परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तातडीने मंजुर करावे, असा सूर उमटला.  परभणीकर संघर्ष समितीचे निमंत्रक माजी आमदार डॉ. विजय गव्हाणे म्हणाले, गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीची मागणी शासन दरबारी रेटून धरत आहोत. परभणीने सर्व निकष पूर्ण केलेले असतांनाही महाविद्यालयास अद्यापही मंजुरी मिळत नाही.

स्वतः शरद पवारांनी आपल्या शब्द दिला आहे. आता मुख्यमंत्र्यांनी  दिलेल्या शब्दाचे ही पालन करावे. दरम्यान, पालकमंत्री नवाब मलिक यांनी धरणे आंदोलनकर्त्याची भेट घेवून त्यांचे निवेदन स्विकारले. परभणीकरांनी उस्मानाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयाला मंजुरी मिळाल्यानंतर गैरसमज करून घेऊ नये, किंवा संभ्रमात देखील राहू नये, लवकरच परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा प्रश्न देखील मार्गी लागेल, असा विश्वास दिला.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com