बारा वर्षात काय केले विचारणाऱ्यांना मतदारांनी मतपेटीतून उत्तर दिले..

महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांतील प्रमुख नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच पदवीधरांच्या भक्कम साथीने हा विक्रमीविजय मला प्राप्त करता आला. प्रत्येक ठिकाणी खांद्याला खांदा लावून लढलेल्या कार्यकर्त्याच्या ऐकीने ऐतिहासिक विजय प्राप्त होतो,हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.शैक्षणिक,राजकीय,सामाजिक यासह विविध संघटनांनी दिलेला जाहीर पाठींबा व अमूल्य साथ देखील तेवढीच महत्वाची होती.
mla satish chavan reaction news
mla satish chavan reaction news

औरंगाबाद ः मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी मतदारांनी उत्साहाने विक्रमी मतदान केले. मतांचा वाढलेला टक्का पाहून विरोधकांनी आपली हवा असल्याचे चित्र निर्माण केले. पण त्यांच्या हवेचा फुगा मतदारांनी निकालानंतर फोडला. बारा वर्षात काय केले विचारणाऱ्या विरोधकांना मतदारांनी मतपेटीतून जोरदार प्रत्युत्तर दिल्याचा टोला आमदार सतीश चव्हाण यांनी लगावला. महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने खांद्याला खांदा लावून काम केल्यामुळेच हा विजय प्राप्त झाल्याचे सांगत चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निकालाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले होते. महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण सलग तिसरा विजय मिळवणार? की मग भाजप हा मतदारसंघ पुन्हा खेचून नेणार? यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगल्या होत्या. परंतु मतमोजणीला सुरवात झाली आणि महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांनी पहिल्या फेरीपासूनच भक्कम आघाडी घेतली. त्यामुळे त्यांचा विजय तिसऱ्या फेरीतच निश्चित झाला होता. हॅट्रीक आणि विक्रमी ५८ हजार मतांच्या मताधिक्याने विजय मिळवल्यानंतर चव्हाण यांनी मतदारांचे तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याचे आभार व्यक्त केले.

सतीश चव्हाण म्हणाले, गेली दोन टर्म पदवीधर, शिक्षक, सुशिक्षित बेरोजगारांचे जे प्रश्न मी सभागृहात मांडले आणि सोडवले,त्या कामाची पावती मला मतदारांनी मतपेटीतून दिली आहे. वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा आधार घेत विरोधी पक्षाने आपलाच विजय होणार ,अशी हवा करण्याचा प्रयत्न केला. परंतु निकालांती त्यांचा फुगा फुटला.  सतीश चव्हाण यांनी बारा वर्षात काय केले? असा प्रश्न विचारणार्‍यांना पदवीधर मतदारांनी मतपेटीतून जोरदार प्रत्युत्तर दिले.

महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांतील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पदवीधरांच्या भक्कम साथीने हा विक्रमी विजय मला प्राप्त करता आला. प्रत्येक ठिकाणी खांद्याला खांदा लावून लढलेल्या कार्यकर्त्याच्या ऐकीने ऐतिहासिक विजय प्राप्त होतो, हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. शैक्षणिक, राजकीय, सामाजिक यासह विविध संघटनांनी दिलेला जाहीर पाठींबा व अमूल्य साथ देखील तेवढीच महत्वाची होती.

मराठवाड्यातील माझ्या तमाम सुज्ञ पदवीधर बंधू आणि भगिनींनी मला बारा वर्षांत केलेल्या कामाची पावती देत माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. त्यांच्या विश्वासाला मी कदापी तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही देखील सतीश चव्हाण यांनी आपल्या विजयानंतरच्या प्रतिक्रियेतून दिली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com