गोपीनाथ गडावर स्मृती स्थळाचे दर्शन घेत बोराळकरांनी केला विजयाचा निश्चय.... - Visiting the memorial site at Gopinath fort, Boralkar decided to win | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

गोपीनाथ गडावर स्मृती स्थळाचे दर्शन घेत बोराळकरांनी केला विजयाचा निश्चय....

सरकारनामा ब्युरो
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

प्रचार दौऱ्या दरम्यान, शिरीष बोराळकर यांनी गोपीनाथ गडावर जाऊन त्यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेत विजयसाठी आशिर्वाद मागितले. गोपीनाथ मुंडे यांचे बोराळकर यांना आमदार करण्याचे अपुर्ण स्वप्न पुर्ण करण्यासाठी भाजपचे नेते, पदाधिकारी ऐकजुटीने प्रयत्न करतील, असा विश्वास देखील गोपीनाथ गडावर व्यक्त करण्यात आला.

औरंगाबाद ः भारतीय जनता पार्टी व महायुतीचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे अधिक्रुत उमेदवार शिरीष बोराळकर यांनी गोपीनाथ गडावर जाऊन त्यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे अपुर्ण राहिलेले स्वप्न पुर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांचे आशिर्वाद देखील बोराळकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मागितले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून भाजपने शिरीष बोराळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. मागील पदवीधर निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले होते. त्यामुळे भाजपवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता. कार्यकर्ते निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नसल्याने संपूर्ण यंत्रणाच विस्कळीत झाली होती. परिणामी बोराळकर यांचा विजय हुकला होता.

पक्षाने आता नव्याने त्यांना संधी देण्याचा निर्णय घेत पुर्वी भाजपकडे असलेला हा मतदारसंघ पुन्हा खेचून आणण्यासाठी शक्तीपणाला लावली  आहे. प्रचार दौऱ्या दरम्यान, शिरीष बोराळकर यांनी गोपीनाथ गडावर जाऊन त्यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेत विजयसाठी आशिर्वाद मागितले. गोपीनाथ मुंडे यांचे बोराळकर यांना आमदार करण्याचे अपुर्ण स्वप्न पुर्ण करण्यासाठी भाजपचे नेते, पदाधिकारी ऐकजुटीने प्रयत्न करतील, असा विश्वास देखील गोपीनाथ गडावर व्यक्त करण्यात आला,

पंकजा मुंडे उद्या शहरात..

शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या उद्या (ता.२३) सोमवारी शहरात येणार आहेत. दुपारी  बारा वाजता तापडीया नाट्य मंदिर, निराला बाजार, येथे खासदार, आमदार, पदाधिकारी, बुथ प्रमुख, कार्यकर्त्यांचा मेळावा त्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख