कुठे कमी पडलो याचा विचार करून, नव्या विश्वासाने पुन्हा जनतेसमोर जाऊ..

भाजपच्या उमेदवाराला जी मते मिळाली आहेत ती कार्यकर्त्यांच्या बळावर मिळाली आहेत, त्यामुळे मी त्यांचेही आभार व्यक्त करतो.जनतेने दिलेला कौल मान्य करून त्याचा सन्मान करतो, भविष्यात जनतेच्या प्रश्नावर अधिक जोमाने काम करू आणि नव्याने विश्वास संपादन करू
Ex Minister Sambhaji Patil nilangekar reaction news
Ex Minister Sambhaji Patil nilangekar reaction news

निलंगा ः मराठवाडा पदवीधर निवडणुकीत जो कौल मतदारांनी, जनतेने दिला आहे, तो आम्हाला मान्य आहे. लोकशाहीत तो मान्यच करावा लागतो. निश्चितच आम्ही कुठे कमी पडलो याचा विचार, चिंतन करून पुन्हा नव्या विश्वासाने पुढच्यावेळी जनतेसमोर जाऊ, अशा शब्दात माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील पराभव मान्य केला. विजयी झालेल्या उमेदवारांना माझ्या शुभेच्छा, त्यांच्या हातून जनतेची सकारात्मक कामे होवो, हीच अपेक्षा आहे. चांगल्या कामासाठी आमचे त्यांना नेहमीच सहकार्य असेल, असेही निलंगेकर यांनी स्पष्ट केल.

मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर प्रमुख म्हणून जबादारी सोपवण्यात आली होती. त्यामुळे भाजपच्या दारूण झालेल्या पराभवाबद्दल ते काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. सरकारनामा प्रतिनिधीने निलंगेकरांशी संपर्क साधला असता हा पराभव आम्ही खुल्या दिलाने स्वीकारतो, कुठे कमी पडलो, चुकलो याचा विचार आणि चिंतन करणार असल्याचे त्यांनी सांगतिले.

निलंगेकर म्हणाले, भाजपच्या प्रत्येक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्याने खूप मेहनत घेतली होती. अगदी बुथ स्तरापर्यंत आमचे कार्यकर्ते पोहचले होते. त्यामुळे भाजपला चांगले यश मिळेल, असा आमचा अंदाज होता. पण अपेक्षे प्रमाणे यश मिळाले नाही. शेवटी प्रत्येक निवडणूकीचे गणित वेगळे असते. आम्हाला कमी मते पडली, त्यामुळे कुठे चूक झाली, काय घडले याचे निश्चितच पुढील काळात चिंतन करू.

भाजपच्या उमेदवाराला जी मते मिळाली आहेत ती कार्यकर्त्यांच्या बळावर मिळाली आहे, त्यामुळे मी त्यांचेही आभार व्यक्त करतो.जनतेने दिलेला कौल मान्य करून त्याचा सन्मान करतो, भविष्यात जनतेच्या प्रश्नावर अधिक जोमाने काम करू आणि नव्याने विश्वास संपादन करू असेही निलंगेकरांनी स्पष्ट केले. विजयी उमेदवारांना पुन्हा एकदा माझ्या शुभेच्छा, त्यांच्या हातून जनतेची चांगली कामे व्हावीतअशा सदिच्छा देखील निलंगकेरानी सतीश चव्हाण यांना दिल्या.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com