...तर गिरीश महाजनांचा भर चौकात सत्कार करू : गुलाबराव पाटील  - then we will greet girish mahajan at open square said gulabrao patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

...तर गिरीश महाजनांचा भर चौकात सत्कार करू : गुलाबराव पाटील 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 1 मे 2021

राज्यात जर लसी उपलब्ध झाल्या तर तीन महिन्यांत संपूर्ण राज्यात लसीकरण करण्याची सक्षम यंत्रणा आपल्याकडे आहे. परंतु लसी उपलब्ध नसल्यास प्रत्यक्ष देव जरी आला तरी काही करू शकत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे राज्याला केंद्राकडून जास्तीत जास्त लस उपलब्ध होण्याची गरज आहे.

जळगाव : पश्चिम बंगालमध्ये गिरीश महाजन यांना अमित शहा यांनी व्यासपीठावर बोलाविले होते. आता त्याच वजनाचा फायदा करून महाजन यांनी केंद्राकडून महाराष्ट्राला जास्तीत जास्त लस उपलब्ध करून द्यावी. हे करण्यात ते यशस्वी झाले, तर आपण त्यांचा भर चौकात सत्कार करू, असा टोला शिवसेना नेते व राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात झेंडा वंदन करण्यात आले. यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. माजी मंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांनी राज्य सरकार राजकारण करीत असल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना पाटील म्हणाले की, कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, बारा कोटी लस आम्हाला दया आम्ही पूर्ण रक्कम देण्यास तयार आहोत. त्यामुळे लस उपलब्ध करण्याचा अधिकार कोणाला आहे, हे गिरीश महाजन यांना चांगले माहीत आहे. त्यामुळे याचे राजकारण कोण करीत आहे, हेसुद्धा महाजन यांनाच माहीत आहे. 

राज्यात जर लसी उपलब्ध झाल्या तर तीन महिन्यांत संपूर्ण राज्यात लसीकरण करण्याची सक्षम यंत्रणा आपल्याकडे आहे. परंतु लसी उपलब्ध नसल्यास प्रत्यक्ष देव जरी आला तरी काही करू शकत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे राज्याला केंद्राकडून जास्तीत जास्त लस उपलब्ध होण्याची गरज आहे. गिरीश महाजन यांना माझा सल्ला आहे की, नुकतेच पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणूक प्रचारात अमित शहा यांनी त्यांना वरती बसण्यासाठी बोलाविले होते. त्या वरती बसण्याचा परिणाम जर काही झाला असेल तर त्यांनी तो प्रभाव वापरून महाराष्ट्राकरिता जास्तीत जास्त लस उपलब्ध करून द्यावी. ती त्यांनी उपलब्ध केली तर आपण त्यांचा जाहीर सत्कार चौकात करणार आहोत, असे गुलाबराव पाटील म्हणाले. 

हेही वाचा : ‘या’ नाकर्तेपणाचे उत्तर राज्य सरकार देणार आहे काय ? : आता दानवेंचा हल्लाबोल

ममताच येणार
पश्चिम बंगाल निवडणूक निकाल उद्या जाहीर होणार आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले, टीव्ही वाहिन्यांवर जे आपण पाहिले त्यानुसार त्या ठिकाणी ममता बॅनर्जी याच पुन्हा विजयी होतील, असे दिसत आहे.
Edited By : Atul Mehere
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख