माहूर देवस्थान विश्वस्त मंडळात ५० टक्के महिला घ्या; तृप्ती देसाईंची मागणी

रेणुका मातेच्या पुजेचा तसेच इतर महत्वाचे निर्णय घेतांना महिलांचे मत विचारात घेणे आवश्यक आहे. देवीची पुजा, आंघोळ, पातळ नेसवणे, साज-शृंगार ही सेवा पुरूषांनी करणे म्हणजे महिलांचा अपमानच आहे. त्यामुळे यासाठी विश्वस्त मंडळात आणि पुजाऱ्यांमध्ये देखील पन्नास टक्के महिलांचा समावेश केला जावा, ही आमची आग्रही मागणी आहे.
Trupti Desai press news nanded
Trupti Desai press news nanded

नांदेड : माहूरच्या रेणुका मंदिरात देवीला आंघोळ घालणे, पातळ नेसवणे, मंगळसुत्र घालून देवीचा शृंगार वगैरे विधी पुरूष पुजाऱ्यांकडूनच केला जातो. हा समस्त महिलांचा अपमान आहे. त्यामुळे माहूर रेणुका देवी संस्थानच्या विश्वस्त मंडळात तसेच पुजाऱ्यांमध्ये ५० टक्के महिलांचा समावेश करावा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे. यासाठी आपण आंदोलन उभारणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. देसाई यांनी आपला मोर्चा आता माहूर संस्थानकडे वळवल्याने पुढील काही दिवसांत येथील वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तृप्ती देसाई सध्या नांदेड दौऱ्यावर आहेत. बुधवारी पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी करत खळबळ उडवून दिली. नांदेड जिल्ह्यातील माहूर गड देवस्थान एक प्रसिध्द संस्थान आहे. राज्यभरातून लाखो भाविक इथे दर्शनाला येत असतात. परंतु महिलांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या भूमाता ब्रिगडेच्या तृप्ती देसाईंंनी केलेल्या या मागणीमुळे एका नव्या वादाला सुरूवात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तृप्ती देसाई म्हणाल्या, महिलांवर सतत अन्याय, अत्याचार होत आहेत. महिलांना कमी लेखणे, त्यांना हीन दर्जाची वागणुक देणे असे प्रकार वारंवार घडत आहेेत. ही पुरुषप्रधान संस्कृतीची मानसिकतीा बदलण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. राज्याच्या अनेक भागात गरीब कुटुंबातील मुलींचे हुंड्यापायी वेळेत लग्न  होत नाहीत, तर अनेक संसांर हे लग्नानंतर उघड्यावर येतात. सरकारने या बाबीकडे लक्ष घालणे आवश्यक आहे. 

महिला सबलीकरण, बेटी बचाओ- बेटी पढाओ ही घोषणा सरकारची फक्त कागदावर आहे. आता यापुढे जाऊन मुलींना शिक्षणासोबतच संरक्षण देण्याचा गरज आहे. राज्यात महिलां व मुलींवर बलात्कार, विनयभंग, अत्याचारानंतर खून अशा घटना वाढत आहेत. हे महाराष्ट्रासारख्या राज्याला शोभणारे नाही. नांदेड जिल्ह्यात रामतीर्थ, बिलोली आणि भोकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनांमुळे संबंध राज्य ढवळून निघाले.

बेटी पढाव- बेटी बचाव या धोरणाला हरताळ फासत नराधमांनी या बालिकांचे लचके तोडले. आता बेटी बचाव- बेटी पढाव सोबतच बेटी संरक्षण यासाठी भुमाता ब्रिगेड प्रयत्न करणार असल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले.

माहूरच्या रेणुकामाता मंदिर विश्वस्त मंडळात तसेच पुजाऱ्यांमध्ये ५० टक्के महिलांचा समावेश करावा, अशी मागणी देखील देसाई यांनी यावेळी केली. शक्तीचे प्रतीक असलेल्या रेणुका मातेच्या पुजेचा तसेच इतर महत्वाचे निर्णय घेतांना महिलांचे मत विचारात घेणे आवश्यक आहे. देवीची पुजा, आंघोळ, पातळ नेसवणे, साज-शृंगार ही सेवा पुरूषांनी करणे म्हणजे महिलांचा अपमानच आहे. त्यामुळे यासाठी विश्वस्त मंडळात आणि पुजाऱ्यांमध्ये देखील पन्नास टक्के महिलांचा समावेश केला जावा, ही आमची आग्रही मागणी आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com