घेरण्याची भाषा करणाऱ्या भाजपला शिवसेना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही..

विकासाबद्दल कुणी तोंड उघडावे, अशी परिस्थिती अजिबात नाही. या शहराला सुपर करण्याचा विडा शिवसेनेने उचलला आहे, आणि आम्ही संभाजीगरला सुपर करणारच आहोत. त्यामुळे कुणी कितीही घेरण्याची भाषा केली, तर आम्ही त्यांना पाणी पाजणारच, असा इशाराही अंबादास दानवे यांनी दिला आहे.
mla ambadas danve viral video news aurangabad
mla ambadas danve viral video news aurangabad

औरंगाबाद ः हिंदुत्व, संभाजीनगर, खान पाहिजे की बाण आणि विकासाच्या मुद्यावर येणाऱ्या महापालिका निवडणुकी शिवसेनेला घेरण्याची भाषा भाजपकडून सुरू झाली आहे. मुंबईत निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत भाजपने ही रणनिती आखल्याची माहिती आहे. पण शिवसेनेला घेरण्याची भाषा करणाऱ्या भाजपला आम्ही पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी सोशल मिडियाच्या माध्मयातून दिला आहे.

महापालिका निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नसल्या तरी निवडणुकीचे वारे मात्र शहरात वाहायला सुरूवात झाली आहे. गेली २५ वर्ष सत्तेत सोबत असलेले शिवसेना-भाजप हे दोन पक्ष या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे राहणार आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षात सध्या कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेला धक्का देण्याचा निर्धार करत भाजपने खास रणनिती आखली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काल मुंबईत झालेल्या बैठकीत शिवसेनेला घेरण्याची तयारी करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी भाजपला चांगला दम भरला आहे. आम्हाला घेरण्याची भाषा करणाऱ्यांना पाणी पाजणार, असे म्हणत दानवे यांनी भाजपला सुनावले आहे. सोशल मिडियावर दानवे यांचा एक व्ह्डिओ सध्या चांगलाच चर्चिला जातोय. यामध्ये दानवे यांनी भाजपला खडेबोल सुनावतांनाच हिंदुत्व आणि संभाजीनगरबद्दल कुणा आम्हाला शिकवण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.

दानवे म्हणाले, हिंदुत्व, संभाजीनगर, खान पाहिजे की बाण? आणि विकासाच्या मुद्यावर महापालिका निवडणुकीत शिवसेनेला घेरायचं असं भाजपने मुंबईत काल झालेल्या बैठकीत ठरवलं आहे. मी त्यांना सांगू इच्छिताे शिवसेनेला औरंगाबादेत घेरणारा अजून जन्माला यायचायं. हिंदुत्वाबद्दल तर आम्हाला कुणी शिकवूच नये. राहयला प्रश्न संभाजीनगरचा तर या मुद्यावर आम्ही गेली ३२ वर्ष लढा देतोय.

औरंगाबादचे संभाजीनगर व्हावे, यासाठी शिवसेनेने ४५ आंदोलन केली. राज्यात युतीचे सरकार होते तेव्हा संभाजीगरचा निर्णय तेव्हाच्या मंत्रीमंडळाने घेतला होता. पुढे हा विषय न्यायालयात गेला. त्यानंतर देखील सातत्याने आम्ही हा विषय मांडत होतो, त्यासाठी पाठपुरावा करत होतो. संभाजीनगर झाले पाहिजे, ही आमची मागणी होती आणि आहेच.

खान पाहिजे की बाण पाहिजे? तर आमचा हा प्रश्न नेहमीच राहिलेला आहे. कारण शिवसेनेने संभाजीगरातील रझाकारी संपवली हे येथील जनतेला चांगले माहित आहे. जेव्हा संकट आले, तेव्हा आम्ही शेपूट घालून घरात बसून राहिलो नाही, तर रस्त्यावर उतरून जनतेचे संरक्षण केले. त्यामुळे खान पाहिजे की बाण? हा आमचा मुद्दा असणारच आहे, असेही दानवे यांनी ठणकावून सांगितले.

शिवसेनेने विकास केलाच..

विकासाचे म्हणाल, तर शिवसेनेने औरंगाबादचा विकास केलाच आहे. आशिया खंडातील झपाट्याने वाढणारे शहर असा लौकिक असलेल्या शहरात ७५० उद्योगांच्या माध्मयातून अडीच लाख लोकांना रोजगार मिळालेला आहे. शहरात मोठे रस्ते, सिद्धार्थ उद्यान, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, डाॅ. अबुल कलाम संशोधन केंद्र, उड्डाणपुलं अशी अनेक कामे झालेली आहेत.

शहरवासियांना पिण्याच्या पाण्याची योजना, सफारी पार्क, असे शहराला सुपर संभाजीनगर करणारे अनेक प्रकल्प होऊ घातलेले आहेत. त्यामुळे विकासाबद्दल कुणी तोंड उघडावे, अशी परिस्थिती अजिबात नाही. या शहराला सुपर करण्याचा विडा शिवसेनेने उचलला आहे, आणि आम्ही संभाजीगरला सुपर करणारच आहोत. त्यामुळे कुणी कितीही घेरण्याची भाषा केली, तर आम्ही त्यांना पाणी पाजणारच, असा इशाराही अंबादास दानवे यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com