ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनाच असेल नंबर वन : खैरेंचा दावा

ग्रामपंचायतीसह यापुढील सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कुणी कितीही स्वबळाची भाषा केली तरी त्यांना नेत्यांचे ऐकावेच लागेल. औरंगाबाद महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी घेतली होती. पण तसे होणार नाही, आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढू, त्यांना देखील त्यांच्या नेत्यांचे ऐकावे लागेल, असेही खैरे म्हणाले.
Shivsena ledear chandrakant khaire  news Latur
Shivsena ledear chandrakant khaire news Latur

लातूर ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महाविकास आघाडी सरकार सक्षमपणे काम करत आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत याची पावती मतदारांना महाविकास आघाडीला दिलीच आहे. त्यामुळे ग्रामपंचयात निवडणुका देखील आघाडी मिळूनच लढवायच्या असा निर्णय वरिष्ठ स्तरावर झालेला आहे. कुठेही विरोधकांसाबेत जाण्याचा प्रश्नच येत नाही,असे स्पष्ट करतांनाच ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना नंबर वनचा पक्ष ठरेल असा दावा, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे लातूर दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसार माध्यमाशी बोलतांना त्यांनी संभाजीनगरसह ग्रामपंचयात निवडणुकीत महाविकास आघाडीला किती यश मिळेल, शिवसेना यात कुठे असेल या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली. खैरे म्हणाले, औरंगाबादचे संभाजीनगर झाले पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आजची नाही तर गेल्या कित्येक वर्षांची आहे. ८ मे १९८८ रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील जाहीर सभेत बाळासाहेबांनी संभाजीनगर नावाची घोषणा केली होती. आता त्यांचे हे स्वप्न त्यांचे सुपूत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुर्ण करतील. विरोधकांनी कितीही टीका केली, तरी औरंगाबादचे संभाजीनगर होणारच.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात अनेक विकासकामे झाली आहेत, होत आहेत. कोरोना सारख्या जागतिक संकटाला देखील सरकारने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली धीरोदत्तपणे परतवून लावले आहे. पहाटे तीन वाजेपर्यंत उद्धव ठाकरे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी नेत्यांशी बोलून जनतेला मदत करण्यासाठी आवाहन करत होते, वेळोवेळी परिस्थिती जाणून घेत होते. शिवसैनिकांनी देखील जीवाची पर्वा न करता लोकांना मदतीचा हात दिला. तेव्हा टीका करणारी भाजप कुठे होती, असा सवाल देखील खैरे यांनी उपस्थित केला.

ग्रामपंचायतीसह यापुढील सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कुणी कितीही स्वबळाची भाषा केली तरी त्यांना नेत्यांचे ऐकावेच लागेल. औरंगाबाद महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी घेतली होती. पण तसे होणार नाही, आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढू, त्यांना देखील त्यांच्या नेत्यांचे ऐकावे लागेल, असेही खैरे म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com