पत्नीवर अविश्वासानंतर अटक केलेल्या गित्तेच्या घरात दोन गावठी पिस्तुलसह शस्त्रसाठा सापडला..

शशिकांत उर्फ बबन गित्ते यांच्या घराची झडती घेतली असता दोन गावठी पिस्तुल, चार काडतुसे, एक कोयता, लाठ्या - काठ्या अशी शस्त्रेही आढळून आली. अटकेसह या कारवाईमुळे परळीत काही काळ तणाव निर्माण झाला.
Gitte arrest and found wepeons in his house news beed
Gitte arrest and found wepeons in his house news beed

बीड : सकाळी पत्नी उर्मिला गित्ते यांच्या विरोधात दहा विरुद्ध शुन्य असा अविश्वास ठराव पारीत झाल्यानंतर गुरुवारी (ता. सात) सायंकाळी त्यांचे पती शशिकांत उर्फ बबन गित्ते यांना अटक करण्यात आली. जमावबंदीचे नियम तोडल्याप्रकरणी अटकेनंतर घराची झडती घेतली असताना गावठी पिस्तुलांसह पोलिसांना शस्त्रे आढळली. 

जनक्रांती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून काम करणारे शशिकांत उर्फ बबन गित्ते यांनी विधानसभा निवडणुकीत परळीतून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांना मदत केली होती. त्या बदल्यात वर्षभरापूर्वी त्यांच्या पत्नी उर्मिला गित्ते यांना परळी पंचायत समितीचे सभापतीपद देण्यात आले. मात्र, सभापतीपदाच्या काळात राष्ट्रवादीच्या सदस्यांसह सरपंचांना निधी वाटपात दुर ठेवून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सढळ हात सोडल्याने नाराजी वाढली होती.

अखेर सदस्यांनी उर्मिला गित्ते यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करुन गुरुवारी (ता. सात) दहा विरुद्ध शुन्य असा हा ठराव संमत झाला. यामुळे बबन गित्ते यांचे समर्थक संतापले व एकत्र आले आणि त्यांनी गित्तेंच्या घराबाहेर गर्दी केली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल जायभाये, पोलिस निरीक्षक हेमंत कदम हे पथकासह अंबाजोगाई रोडवरील बबन गित्ते यांच्या घरासमोर गेले. यावेळी येथील गर्दीला पांगविण्याचा प्रयत्न केला.

मात्र, यावेळी शासकीय कामात अडथळा करुन लोकांनी दुर जाण्यास नकार दिला. त्यामुळे सुरुवातीला शहर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणि जमावबंदीच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शशिकांत उर्फ बबन गित्ते यांच्या घराची झडती घेतली असता दोन गावठी पिस्तुल, चार काडतुसे, एक कोयता, लाठ्या - काठ्या अशी शस्त्रेही आढळून आली. अटकेसह या कारवाईमुळे परळीत काही काळ तणाव निर्माण झाला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com