सत्तार साहेब माझ्यासाठी घातलेली टोपी, साडेतीन वर्षांनी आम्हीच काढू : अर्जून खोतकर - Sattar Saheb, the hat I wore for me, we will take it off after three and a half years: Arjun Khotkar | Politics Marathi News - Sarkarnama

सत्तार साहेब माझ्यासाठी घातलेली टोपी, साडेतीन वर्षांनी आम्हीच काढू : अर्जून खोतकर

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 13 जानेवारी 2021

अब्दुल सत्तार यांनी मला खूप मदत केली, माझ्यासाठी पण केला, डोक्यावरची टोपी काढणार नाही असा संकल्प केला, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. पण मी आज जाहीरपणे तुमची माफी देखील मागतो. माझ्यामुळे तुमच्या डोक्यावरच्या टोपीचा मुक्काम वाढला याची मला जाणीव आहे. पण शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या साक्षीने मी तुम्हाला शब्द देतो, साडेतीन वर्षांनी तुमच्या डोक्यावरची टोपी आम्हीच काढू.

जालना ः सत्तार साहेब तुम्ही मला खूप मदत केली, माझ्यामुळे तुमच्या डोक्यावरच्या टोपीचा मुक्काम पाच वर्ष वाढला, त्याबद्दल मी सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांसमोर तुमची माफी मागतो. पण माझ्यासाठी तुम्ही डोक्यावर घातलेली टोपी साडेतीन वर्षांनी मीच काढीन हा शब्द तुम्हाला देतो, असे म्हणत माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव करण्याचा निर्धार व्यक्त केला.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने जालन्यात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत आज पार पडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना खोतकर पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत घ्यावी लागलेली माघार, आणि विधानसभेला भाजपने केलेली दगाबाजी यावर भाष्य केले. खोतकर म्हणाले, ४० वर्ष शिवसेना-भाजप सोबत होती,

त्या्मुळे एकदम निर्णय घेणे शक्य नव्हते. आम्ही कधीही त्यांच्याशी वाईट वागलो नाही, कधी त्यांच्या अपमान केला नाही, पण ते असे का वागले? अजूनही छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष घालतात, आमच्यामध्ये मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतात. पण आम्हाला आमच्या मर्यादा माहित आहेत.

अब्दुल सत्तार यांनी मला खूप मदत केली, माझ्यासाठी पण केला, डोक्यावरची टोपी काढणार नाही असा संकल्प केला, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. पण मी आज जाहीरपणे तुमची माफी देखील मागतो. माझ्यामुळे तुमच्या डोक्यावरच्या टोपीचा मुक्काम वाढला याची मला जाणीव आहे. पण शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या साक्षीने मी तुम्हाला शब्द देतो, साडेतीन वर्षांनी तुमच्या डोक्यावरची टोपी आम्हीच काढू. आपल्याला या राक्षसाला गाडायचे आहे, तुमची साथ आहे ना? असे आवाहन खोतकर यांनी उपस्थितांना केले.

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख