ओबीसींसाठी गोपीनाथ मुंडेंनी जो संघर्ष केला, त्याला सलाम- विजय वडेट्टीवार

बाळासाहेब सराटे नावाचा व्यक्ती आमचे हक्क हिरावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी यावेळी केला.आम्ही वेळीच लक्ष देवूनवकील दिला नसता तर ओबीसचं आरक्षण रद्द झालं असतं. बारा बलुतेदारांचे स्वतंत्र महामंडळ स्थापन केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
Minister vijay wadettiwar news Jalna
Minister vijay wadettiwar news Jalna

जालना ः ओबीसी समाजासाठी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी जो संघर्ष केला त्याला सलामच केला पाहिजे. त्यांचा हा लढा पुढे छगन भुजबळ आणि इतर नेत्यांनी सुरू ठेवला. मी मंत्री नंतर आधी समाजाचा प्रतिनिधी आधी आहे. त्यामुळे समाजाच्या प्रश्नावर सदैव पुढे राहणार, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जालना येथील ओबीसी मोर्चात बोलतांना दिली.

ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, या मागणीसाठी आज जालन्यात भव्य मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातून ओबीसी समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. या शिवाय राजकीय नेते, पुढेरी देखील या मोर्चा सहभागी होते. मोर्च्याची सांगता होऊन छोटेखानी सभेत रुपांतर झालेल्या मोर्चेकऱ्यांना वडेट्टीवार यांनी मार्गदर्शन केले. 

वड्डेटीवार म्हणाले.हा मोर्चा कुणाच्या विरोधात नाही, तो फक्त आमच्या न्याय हक्कासाठी आहे. ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी, या मागणीसाठी  आहे. कुणाला काय द्यायचं ते द्या, पण आमच्या हक्काचं आम्ही सोडणार नाही. ज्या मागण्यांच निवेदन मला देण्यात आल आहे, ते प्रश्न मी सातत्याने मांडत आलो आहे. पक्ष, धर्म, जातपात सोडून  फक्त ओबीसी म्हणून मी लढत आहे.

`जो ओबीसी की बात करेगा, वो ही देश पे राज करेगा`, ही प्रेरणा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडून आम्हाला मिळाली आहे. ते आज हयात नाहीत, पण त्यांनी या समाजासाठी केलेला संघर्ष कधी विसरता येणार नाही, त्यांनी केलेल्या संघर्षाला सलाम केलाच पाहिजे. आता छगन भुजबळ यांनीही समाजाचे प्रश्न सोडवण्याची धुरा हाती घेतली आहे. ते देखील सातत्याने ओबीसींच्या प्रश्नांसाठी झटत असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. 

मार्ग मोकळा करा, पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांना विनंती

सत्तेत असलो, मंत्री असलो तरी याही पेक्षा आमच्यासाठी समाज आहे. भविष्यात कशाचीही पर्वा न करता आम्ही समाजासाठी संघर्ष करतच राहू, असा विश्वास देखी वडेट्टीवार यांनी उपस्थितांना दिला. आमच्या स्वतंत्र जनगणनेचा मार्ग मोकळा करा, अशी माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती असल्याचेही ते म्हणाले. 

विधानसभेत स्वतंत्र जनगणनेचा मी प्रस्ताव मांडणार आहे. पक्षाच्या पलीकडे लढाई जात नाही तोपर्यंत यश मिळणार नाही. बाळासाहेब सराटे नावाचा व्यक्ती आमचे हक्क हिरावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी यावेळी केला.आम्ही वेळीच लक्ष देवून वकील दिला नसता तर ओबीसचं आरक्षण रद्द झालं असतं. बारा बलुतेदारांचे स्वतंत्र महामंडळ स्थापन केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे सस्पष्ट करतांनाच महाज्योतीचं कार्यालय औरंगाबादला सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com