मुरूंब्यातील त्या २८ जणांचे अहवाल निगेटीव्ह; प्रशासनाचा जीव भांड्यात..

गावातील कुकुट पालन केंद्रात काम करणारे कामगार व त्यांच्या संपर्कातील इतर व्यक्तीचे स्वॅब तपासणीचे आदेश दिले होते. त्यावरून शनिवार, रविवार व सोमवारी या गावातील २८ ग्रामस्थांचे थ्रोट सॅंपल घेवून ते तपासणीसाठी पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. या तपासणीचा अहवाल मंगळवारीदुपारी आरोग्य विभागाकडे आला. या अहवालात सर्वच्या सर्व २८ जणांचे स्वॅब अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. शंकरराव देशमुख यांनी दिली.
Bird Flue news parbhani
Bird Flue news parbhani

परभणी ः मुरुंबा येथील बर्ड प्लुमुळे ८०० कोंबड्या मरण पावल्या होत्या. त्यामुळे गावासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. या कोंबड्याच्या कुकुटपालन केंद्रात काम करणारे कामगार व त्यांच्या संपर्कात आलेल्या २८ जणांचे स्वॅब घेवून त्यांना कॉरंन्टाईन करण्यात आले होते. पंरतू या सर्व नागरीकांचे स्वॅब तापसणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे गावकऱ्यासह प्रशासनाचा जीव भांड्यात पडला आहे.

मुरुंबा (ता.परभणी) या गावातील ८०० कोंबड्यांचा अज्ञात रोगाने मृत्यु झाला होता. जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभागाने तात्काळ गावात धाव घेऊन उपायोजना करित पक्षांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. तिथून हे स्वब भोपाळ येथे पाठवण्यात आले ज्यांचा अहवाल रविवारी  रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. त्यात 'बर्ड फ्लू'मुळेच कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते.  यामुळे संपूर्ण जिल्हाभरात खळबळ उडाली होती.

जिल्हा प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना म्हणून गावातील कुकुट पालन केंद्रात काम करणारे कामगार व त्यांच्या संपर्कातील इतर व्यक्तीचे स्वॅब तपासणीचे आदेश दिले होते. त्यावरून शनिवार, रविवार व सोमवारी या गावातील २८ ग्रामस्थांचे थ्रोट सॅंपल घेवून ते तपासणीसाठी पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. या तपासणीचा अहवाल मंगळवारी दुपारी आरोग्य विभागाकडे आला. या अहवालात सर्वच्या सर्व २८ जणांचे स्वॅब अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. शंकरराव देशमुख यांनी दिली. त्यामुळे ग्रामस्थांसह जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पशु संवर्धन विभागातील अधिकाऱ्यांचा जिव भांड्यात पडला आहे.

दरम्यान, मंगळवारी सकाळपासून गावातील कुकुटपालन केंद्रातील कोंबड्यांना मारण्यासाठी प्रक्रिया सुरु होती. त्यासाठी गावालगत असणाऱ्या मोकळ्या जागेत मोठे खड्डे करण्यात आले. या तीन खड्यात या कोंबड्या पुरल्या जाणार आहेत. परभणी शहरातील मांस विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानात स्वच्छता ठेवावी यासाठी महापालिका आयुक्तांनी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार ज्या मांस विक्रेत्याच्या दुकानात स्वच्छता ठेवली जाणार नाही त्यावर कारवाई केली जाणार आहे. खरबदरीचा उपाय म्हणून हा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com