रावसाहेब दानवेंच्या भोकरदनमध्ये महाविकास आघाडीचा बोलबाला..

पारध ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव यांच्या पॅनल विरोधात भाजप -राष्ट्रवादीने केली होती. तरी देखील शिवसेनेच्या पॅनलने पंधरा पैकी १२ जागा जिंकत भाजप- राष्ट्रवादीला धूळ चारली. भाजपला इथे फक्त तीन जागा जिंकता आल्या.
Minister raosaheb danve  news Jalna
Minister raosaheb danve news Jalna

भोकरदन ः ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांचा पिटारा उघडण्यास सुरूवात झाली तसे मोठ्या नेत्यांना धक्के बसत आहेत. भाजपचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री यांचा तालुका आणि त्यांचे पुत्र आमदार असलेल्या भोकरदन तालुक्यात भाजपला चांगला दणका बसला आहे. तालुक्यातील अनेक ग्रामंपचायतींवर गेल्या अनेक वर्षांपासून असलेली भाजपची सत्ता उलटवत महाविकास आघाडीने मुंसडी मारल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई ग्रामंपचायतीवर गेल्या वीस वर्षापासून भाजपची सत्ता आणि वर्चस्व होते. या सत्तेला राष्ट्रवादीने सुरूंग लावत १३ पैकी १२ जागा जिंकल्या आहेत. भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांचे हे गाव आहे.

अशीच काहीशी परिस्थिती सुरंगळी ग्रामपंचायती मध्ये देखील पहायला मिळाली. येथील सर्वच्या सर्व ११ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. इथे भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दीपक जाधव यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला आहे. 

भाजप-राष्ट्रवादीला शिवसेनेचा दणका

पारध ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव यांच्या पॅनल विरोधात भाजप -राष्ट्रवादीने केली होती. तरी देखील शिवसेनेच्या पॅनलने पंधरा पैकी १२ जागा जिंकत भाजप- राष्ट्रवादीला धूळ चारली. भाजपला इथे फक्त तीन जागा जिंकता आल्या. 

सिपोरा बाजार येथे रावसाहेब दानवे यांचा रामेश्वर सहकारी साखर कारखाना असून इथे देखील भाजपचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादीने इथे नऊ जागा जिंकत भाजपला धूळ चारली आहे.

एकंदरित राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा प्रभाव आता गावपातळीवर देखील दिसून येत आहे. रावसाहेब दानवे हे दोन वेळा आमदार, पाच वेळा खासदार तर त्यांचे चिरंजीव संतोष दानवे हे भोकरदन- जाफ्राबाद मतदारसंघाचे दोन टर्म प्रतिनिधित्व करत आहेत. असे असतांना ग्रामपंचायत निवडणुकीत लोकांनी भाजपला नाकारल्याचे दिसून आले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com