पंकजा आल्या आणि `यशश्री’ बंगला पुन्हा गर्दीने फुलला!

परळीतील मुंडेंचा यशश्री बंगला आणि दिवसरात्र गर्दी हे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यापासूनचे समिकरण आहे. गुरुवारी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे येताच हा बंगला पुन्हा गर्दीने फुलून गेला.
pankja munde parli news
pankja munde parli news

परळी वैजनाथ : परळीतील मुंडेंचा यशश्री बंगला आणि गर्दी हे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यापासूनचे समिकरण. याचाच प्रत्यय गुरुवारी पुन्हा आला. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि भाजपच्या मध्यप्रदेश सहप्रभारी पंकजा मुंडे परळीत दाखल होताच पुन्हा यशश्री गर्दीने फुलून गेला. कार्यकर्त्यांची मुंडे यांच्याबद्दलची आपुलकी आणि ओढही कायम असल्याचे या निमित्ताने दिसले.

परळीत बसस्थानक परिसरातच मुंडे यांचा यशश्री नावाचे निवासस्थान आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून हा बंगला आणि गर्दी हे समिकरण ठरलेलेच. मुंडेंचा राज्यभर राबता असल्याने त्यांना यायला उशिर झाला तरी ते शेवटच्या व्यक्तीला भेटल्याशिवाय झोपायला जायचे नाहीत. मग, अगदी पहाटचे पाच वाजले तरी.  दिवंगत मुंडेंना रात्री तीन वाजता समस्या सांगीतली तरी ते लगेच संबंधीतांना त्याच वेळी फोन लावत आणि समोर आलेल्याचे काम मार्गी लावत.

पुढे पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रितम मुंडे यांचाही राबता आणि राजकीय कारभार याच बंगल्यातून सुरु आहे. गर्दीचे समिकरण पुढेही कायम राहीले. मागच्या पाच वर्षांत पंकजा मुंडे राज्यात महत्वाच्या खात्यांच्या मंत्री तर डॉ. प्रितम मुंडे खासदार होत्या. दरम्यान, आता राजकीय परिस्थितीत काहीसा फरक पडला असला तरी गर्दीत मात्र पडलेला नसल्याचे दिसते.

मागच्या वर्षभरात कोविडमुळे या भगीनींच्या परळीत येण्यावर आणि फिजिकल डिस्टन्सींगमुळे भेटींवर मर्यादा आल्या. पण, गुरुवारी पंकजा मुंडे परळीत आल्या आणि पुन्हा बंगल्याला गर्दीने घेरले. प्रत्येकजण अपेक्षेने त्यांच्यापुढे समस्या सांगत होता, पंकजा मुंडे देखील तितक्याच तत्परतेने संबंधितांना फोनद्वारे निर्देश देऊन त्यांच्या समस्या सोडविण्याबाबत सांगत होत्या. परळी मतदारसंघातुन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या अडचणी मार्गी लावल्यानंतर त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी देखील यावेळी त्यांनी केली.

सत्ता नसली तरी जन सामान्यांचे प्रश्न सोडविण्यात त्या नेहमीप्रमाणेच तत्पर असल्याचे दिसून आले. सध्या सर्वत्र विवाह सोहळ्यांची धामधूम सुरू असल्याने आपल्या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या विवाह सोहळ्याना हजेरी लावून त्यांनी नव वधूवरांना त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी सदिच्छा आणि शुभाशिर्वाद दिले. यावेळी पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीने अनेकांना त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही, आणि फोटोसाठी पंकजा मुंडे चाहत्यांचा गराडा पडला.

दिवसभर संपूर्ण जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणे, त्यासाठी संबंधितांना सूचना देणे आणि कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे या व्यस्त दिनक्रमामुळे पंकजा मुंडे यांचा दौरा सर्वसामान्यांच्या सेवेत समर्पित कारणी लागल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com