पाचोडची ग्रामपंचायत पुन्हा ताब्यात घेऊन विजयी षटकार ठोकणारच; भुमरेंचा दावा

गावातील प्रत्येक व्यक्ती, नागरिकाशी तुम्ही बोललांत तरी तुम्हाला परिस्थितीचा अंदाज येईल. निवडणुक पुर्णपणे एकतर्फी झाली आहे, विरोधकांना उमेदवार मिळाले नाही, मग ते चुरस आणि लढत कशी देणार? असा सवाल देखील भुमरे यांनी केला. सतरा उमेदवार निवडूण आणत विरोधकांचे आम्ही डिपाॅझीट जप्त करू.
Minister Sandipa Bhumre Reaction on Grampanchyat Election news
Minister Sandipa Bhumre Reaction on Grampanchyat Election news

औरंगाबाद : पाचोड ग्रामपंचायतीची निवडणुक एकतर्फी होणार आहे, गेल्या पाच वर्षांपासून ही ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आहे. सहाव्यांदा सर्वच्या सर्व सतरा उमेदवार विजयी होऊन आम्ही विरोधकांचे डिपाॅझीट जप्त करू, असा दावा राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी केला आहे. विरोधकांना उमेदवार मिळाले नाही, त्यामुळे चुरस वगैरे काही नव्हती, चुरस फक्त मिडिया, फेसबुक आणि व्हाट्सअॅपवरच होती, असा टोला देखील भुमरेंनी लगावला.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पैठणचे शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांना कॅबीनेट मंत्री म्हणून मंत्रीमंडळात स्थान मिळाले. त्यानंतरची पहिली ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. पाचोड ग्रामपंचायतीवर आतापर्यंत भुमरे यांनी कायम वर्चस्व राखले. यावेळी मंत्री असल्यामुळे ते पाचोडची ग्रामपंचायत बिनविरोध काढतील असा अंदाज होता. पण राज्यात महाविकास आघाडी असूनही भुमरे यांच्या विरोधात काॅंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या सगळ्या पक्षांनी पॅनल उभे केले आणि पाचोड ग्रामपंचायतीची निवडणूक चर्चेत आली.

आज भुमरे यांनी आपल्या कुटुंबासह सकाळी मतदान केले आणि सहाव्यांदा आपण पाचोडची ग्रामपंचयात एकतर्फी, सर्वच्या सर्व सतरा उमेदवार निवडूण आणत ताब्यात घेणार असल्याचा दावा केला. प्रसार माध्यमांशी बोलतांना भुमरे म्हणाले, पाचोडच नाही तर जिल्हा आणि राज्यात देखील शिवसेना आणि महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळणार आहे. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकद आम्ही दाखवून दिली होती. ग्रामपंचायत निवडणूकीत देखील ती दिसेल. भाजपचा नामोल्लेख देखील यावेळी दिसणार नाही, असा दावाही भुमरे यांनी केला. तालुक्यातील ८० पैकी दोन ग्रापंचायती बिनविरोध झाल्या आहेत, त्या देखील शिवसेनेकडे आल्याचे भुमरे यांनी सांगितले.

विरोधकांना उमेदवार मिळाले नाही..

पाचोड ग्रामपंचायत गेली पंचवीस वर्ष शिवसेनेच्या ताब्यात आहे. सहाव्यांदा आम्ही ती ताब्यात घेणार याबद्दल शंका बाळगण्याचे काम नाही. गावातील प्रत्येक व्यक्ती, नागरिकाशी तुम्ही बोललांत तरी तुम्हाला परिस्थितीचा अंदाज येईल. निवडणुक पुर्णपणे एकतर्फी झाली आहे, विरोधकांना उमेदवार मिळाले नाही, मग ते चुरस आणि लढत कशी देणार? असा सवाल देखील भुमरे यांनी केला. सतरा उमेदवार निवडूण आणत विरोधकांचे आम्ही डिपाॅझीट जप्त करू, असा विश्वास देखील भुमरे यांनी व्यक्त केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com