शिवसेना खासदाराने खरेदी केलेल्या जमीनीची चौकशी करा; राष्ट्रवादीच्या आमदाराची मागणी.. - NCP MLA demands inquiry into land deal bought by Shiv Sena MP. | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेना खासदाराने खरेदी केलेल्या जमीनीची चौकशी करा; राष्ट्रवादीच्या आमदाराची मागणी..

गणेश पांडे
गुरुवार, 14 जानेवारी 2021

काहीही करून मला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचे स्पष्ट होते.या जमीन खरेदी विक्री व्यवहाराची चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्जाद्वारे केली आहे. आमदार बाबाजानी यांच्चा अर्जातूनच त्यांचा हेतू स्पष्ट होतो. त्यांनीचे हे षडयंत्र आखले असल्याचा थेट आरोप संजय जाधव यांनी यावेळी केला.

परभणी ः जिल्ह्याच्या राजकारणात मी सलग २७ वर्षापासून अग्रेसर आहे. परंतू मागील लोकसभा निवडणुकीपासून जिल्ह्यातील प्रस्तापित राजकारण्यांच्या डोळ्यात माझा यशस्वी प्रवास बोचतोय. राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी तर मला बदनाम करण्याचे षडयंत्रच आखले आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय जाधव यांनी केला. दुर्राणी यांनी जाधव यांनी खरेदी केलेल्या जमीन व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

एंरडेश्वर (ता.पूर्णा) येथील रामप्रसाद बाबराव काळे यांची जमीन खासदार संजय जाधव यांनी त्यांच्या पत्नी क्रांती जाधव यांच्या नावाने  २७ ऑक्टोबर २०२० रोजी ४४ लाख ५३ हजार रुपयांना रीतसर खरेदी खत करून घेतली. परंतू या शेतीच्या खरेदी - विक्रीवर आता रामप्रसाद काळे यांच्या पत्नीसह मुली व सुनेने आक्षेप घेतला आहे. या कुटूंबाने  संजय जाधव यांच्यावर जमीन बळकावल्याचा आरोप केला आहे. यावर जाधव यांनी  पत्रकारांसमोर बाजू मांडली.

जाधव म्हणाले, जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार पारदर्शक पध्दतीने झालेला आहे. जमीन खरेदीसाठी जी रक्कम ठरली होती. ती रक्कम मी धनादेशाव्दारे रामप्रसाद काळे यांना दिलेली आहे. एकूण सहा धनादेशाद्वारे ४४ लाख ५३ हजार रुपये मी अदा केले आहेत. इतका पारदर्शक व्यवहार असतांनाही मी जमीन बळकावली असा, आरोप केला जात आहे. काळे कुटूंबाच्या पाठीमागे राजकीय वरदहस्त असल्याचे सांगत जिल्ह्यातील प्रस्थापित राजकारण्यांना आपण नको आहोत, असा आरोपही जाधव यांनी केला. 

त्यामुळे काहीही करून मला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचे स्पष्ट होते.या जमीन खरेदी विक्री व्यवहाराची चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्जाद्वारे केली आहे. आमदार बाबाजानी यांच्चा अर्जातूनच त्यांचा हेतू स्पष्ट होतो. त्यांनीचे हे षडयंत्र आखले असल्याचा थेट आरोप संजय जाधव यांनी यावेळी केला.

लोकसभा निवडणुकीत देखील बाबाजानी यांनी 'खासदार बदला जिल्हा बदलेल अशा जाहिराती करून आपल्याला विरोध दर्शविला होता. पंरतू आपण जनतेच्या कृपेने परत खासदार झालो आहोत. हे त्यांच्या पचनी पडले नाही, असा टोला देखील जाधव यांनी दुर्राणी यांना लगावला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख