mp sanjay jadhav news parbhani
mp sanjay jadhav news parbhani

शेतजमीन खरेदी प्रकरणी खासदार जाधव अडचणीत; महिलेचा थेट मातोश्रीवर उपोषणाचा इशारा..

जमीन खरेदी - विक्री व्यवहार होत असतांना आमचे हक्कसोड पत्र देखील घेतलेले नाही. आम्ही दोन बहिणी व मयत भावाची दोन मुले हे वारस ठरतो. परंतू या व्यवहारात असे झालेलेच नाही. आमचे वडील रामप्रसाद काळे हे अधिच मुलाच्या अकाली मृत्युमुळे खचलेले होते. त्यात त्यांच्यावर दबाव टाकून शेत जमीन खासदारजाधव यांनी हडपली असल्याचा थेट आरोप सारिका कदम यांनी यावेळी केला.

परभणी ः एरंडेश्वर (ता.पूर्णा) येथील शेत जमीन खरेदी - विक्री प्रकरणी आम्हाला खासदार संजय जाधव यांनी पूर्णपणे आंधारात ठेवून आमचा विश्वासघात केला आहे असा आरोप करत मयत शिवसैनिक स्वप्नील काळे यांच्या आई प्रेमाताई काळे यांनी थेट मातोश्रीवर उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे.  जमीन खरेदी विक्री प्रकरणाची काळे कुटूंबातील सदस्यांनी पत्रकार परिषद घेवून माहिती दिली.

एंरडेश्वर (ता.पूर्णा) येथील ३ एकर ३५ गुंठे शेतजमिन रामप्रसाद काळे यांच्याकडून खासदार संजय जाधव यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने ४४ लाख ५३ हजार रुपयांना खरेदी केली. या खरेदीसाठी धनादेशाद्वारे रक्कम रामप्रसाद काळे यांच्या बॅंक खात्यावर पाठविण्यात आली असल्याचे जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. परंतू  या खरेदीच्या व्यवहारामध्ये आम्हाला पूर्णपणे आंधारात ठेवण्यात आल्याचा दावा सारिका कदम यांनी केला.

जमीन खरेदी - विक्री व्यवहार होत असतांना आमचे हक्कसोड पत्र देखील घेतलेले नाही. आम्ही दोन बहिणी व मयत भावाची दोन मुले हे वारस ठरतो. परंतू या व्यवहारात असे झालेलेच नाही. आमचे वडील रामप्रसाद काळे हे अधिच मुलाच्या अकाली मृत्युमुळे खचलेले होते. त्यात त्यांच्यावर दबाव टाकून शेत जमीन खासदार जाधव यांनी हडपली असल्याचा थेट आरोप सारिका कदम यांनी यावेळी केला.

जमीन हस्तांतरीत करतांना तलाठी आर.व्ही कवठेकर यांनी  दिलेल्या प्रमाणपत्रात जमीन कोरडवाहू असल्याचे सांगितले आहे. परंतू या जमीनीत विहिरी, दोन बोअर व १० सागाची झाडे आहेत. त्यामुळे तलाठी.कवठेकर यांनी बनावट प्रमाणपत्र दिले असल्याचा आरोपही कदम यांनी केला. या पत्रकार परिदेश रामप्रसाद काळे यांच्या पत्नी प्रेमाताई काळे, मुलगी सारिका कदम, शीतल धाबेकर, स्नुषा वर्षा काळे, व्यंकटेश काळे व सुभाष देशमुख पेडगावकर उपस्थित होते.

वडिलांच्या विरोधात याचिका

हिंदू कायद्या प्रमाणे वडीलोपार्जित शेतीमध्ये मुलींचा ही तेव्हढाच हक्क असतो. आमची संमती न घेता आमचे वडील रामप्रसाद काळे यांनी जमीनीची विक्री केली आहे. ती पूर्णपणे चुकीची असल्यामुळे आम्ही न्यायालयात वडीलाविरोधात याचिका दाखल केली असल्याचे ही सारिका कदम यांनी सांगितले.
 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com