खासदार धानोरकरांचे मोदींना `चॅलेंज` : वाराणसीत येऊन तुमचा `ट्रम्प` करतो...

निर्णय कधी चुकत नसतो, तर घेतलेला निर्णय बरोबर होता, हे सिद्ध करण्याची ताकत तुमच्यात पाहिजे. केवळ १५ दिवसांत जर भाजपच्या मातब्बर नेत्याला पाडता येऊ शकते, तर तीन वर्षांत मोदींना वाराणसीत पाडता येऊ शकते,
Balu Dhanorkar-Narendra Modi
Balu Dhanorkar-Narendra Modi

नागपूर : ``सध्या मी कॉंग्रेसचा महाराष्ट्रातील एकमेव खासदार आहे. आमदार असतानाही पूर्व विदर्भात शिवसेनेचा मी एकमेव आमदार होतो. भाजपचे केंद्रीय गृहराज्यमंत्री राहिलेले हेविवेट नेता हंसराज अहीर यांचा पराभव करून चंद्रपुरात इतिहास रचला. आता पक्षाने परवानगी दिल्यास थेट वाराणसीतून लढून मोदींचा ट्रम्प करून दाखवीन, असे म्हणत खासदार बाळू धानोरकर यांनी थेट पंतप्रधान मोदींनाच इशारा दिला आहे. 

खासदार धानोरकर म्हणाले, मंत्रिपद मिळवण्यासाठी राजकारणात माझा जन्म झाला नाही. तर जे पद आपल्याला मिळते, त्याचा जनकल्याणासाठी उपयोग केला पाहिजे, या मताचा मी आहे. शिवसेनेत असतानाही मी उद्धवजींना सांगितले होते की, चंद्रपूरची जागा आपल्याकडे मागून घ्या. मला लोकसभा लढायची आहे. पण तेव्हा त्यांनी तसे केले नाही. भारतीय जनता पक्षाची विचारधारा मला पटत नसल्यामुळे शिवसेना सोडून मी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि लोकसभा निवडणूक निवडूनही आलो. नरेंद्र मोदींचा इतिहास जर बघितला तर जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा ते साधे आमदारही नव्हते आणि सलग तीन वेळा मुख्यमंत्री राहिले. जेव्हा ते पहिल्यांदा लोकसभा लढले आणि निवडून आले, त्यानंतर पंतप्रधान झाले. 

पक्षाने मला परवानगी दिल्यास मी वाराणसी मतदारसंघात जाऊन मोदींच्या विरोधात लढेन आणि निवडूनदेखील येईन. पूर्व विदर्भातील शिवसेनेचा मी एकमेव आमदार होतो आणि आताही महाराष्ट्रातील कॉंग्रेसचा मी एकमेव खासदार आहे आणि तेसुद्धा भाजपचे केंद्रीय गृहराज्यमंत्री राहिलेले हेविवेट नेता हंसराज अहीर यांचा पराभव करून. त्यामुळे मोदींचा ट्रम्प मी करू शकतो, असे खासदार बाळू धानोरकर आज येथे म्हणाले. माणूस हा कर्तृत्वाने मोठा होतो. कुणी कुणी नशिबाने मोठे होतात. मी तर १५ दिवसांतच लोकसभा निवडणूक लढलो, निवडूनही आलो आणि सिद्ध करून दाखवलं की कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. तेव्हा तर माझ्याकडे केवळ १५ दिवसच होते आता माझ्याकडे तीन वर्ष आहेत. मी आजपासूनच वाराणसीत जाऊन बसेन आणि सहज मोहीम फत्ते करीन, असे धानोरकर म्हणाले. 

जो माणूस पहिली निवडणूक हरतो, त्याला कळते की पुढील निवडणुका लढायच्या कशा आणि जिंकायच्या कशा. माझी पत्नी सौ. प्रतिभा आमदार होईल, असे तेव्हा कुणीही म्हणत नव्हते. सर्वजण म्हणत होते, की खासदार धानोरकरांचा निर्णय चुकला. निर्णय कधी चुकत नसतो, तर घेतलेला निर्णय बरोबर होता, हे सिद्ध करण्याची ताकत तुमच्यात पाहिजे. केवळ १५ दिवसांत जर भाचपच्या मातब्बर नेत्याला पाडता येऊ शकते, तर तीन वर्षांत मोदींना वाराणसीत पाडता येऊ शकते, अशा दृढ विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. वाराणसीच काय देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन मी लढू शकतो. अगदी नागपुरातही लढून विजयी होऊ शकतो, असे खासदार धानोरकर म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com