मोदींच्या `आंदोलनजीवी`, शब्दाने शेतकऱ्यांचा अवमान; शेतकरी मानवतेला जिवीत ठेवणारा.. - Modi's 'Andolanjivi', an insult to farmers with words; Farmers keep humanity alive. | Politics Marathi News - Sarkarnama

मोदींच्या `आंदोलनजीवी`, शब्दाने शेतकऱ्यांचा अवमान; शेतकरी मानवतेला जिवीत ठेवणारा..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

विरोधकांच्या टिकेचा समाचार घेतांना मोदींनी शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने एक नवी जमात देशात निर्माण झाली असल्याचा उल्लेख केला. `आंदोलनजिवी`, असा उल्लेख करत त्यांनी या आंदोलनजिवींचा त्रास त्या त्या राज्यातील सरकारांना होत असतो, असा चिमटाही त्यांनी काढला.

औरंगाबाद ः दिल्लीत कृषी सुधारणा कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टिका केली. ही टीका करत असतांना त्यांनी देशात एक नवी जमात जन्माला आली आहे, ती म्हणजे आंदोलनजीवी, असा टोला लगावला होता. शेतकरी आंदोलनाला आंदोलनजीवी म्हणणे हा त्या शेतकऱ्यांचा अपमान आहे, शेतकरी हा मानवतेला जिवीत ठेवणारा असल्याचे, म्हणत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री काॅंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांच्या या शब्दाचा निषेध केला आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला चीन, पाकिस्तानचा पाठिंबा आहे, आंदोलकांमध्ये देशद्रोही, खलिस्तानवादी घुसले आहेत, असे अनेक आरोप सत्ताधारी भाजपकडून केले गेले. या आंदोलनाला भडकवण्यात विदेशी शक्तींचा हात आहे, देशाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे, असे देखील म्हटले गेले. यासह देशातील सद्य परिस्थिती व राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे अभिनंदन करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत एक तासभर भाषण केले.

विरोधकांच्या टिकेचा समाचार घेतांना मोदींनी शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने एक नवी जमात देशात निर्माण झाली असल्याचा उल्लेख केला. `आंदोलनजिवी`, असा उल्लेख करत त्यांनी या आंदोलनजिवींचा त्रास त्या त्या राज्यातील सरकारांना होत असतो, असा चिमटाही त्यांनी काढला. मात्र शेतकरी आंदोलनाला आंदोलनजिवी म्हटल्या बद्दल अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

पंतप्रधानांच्या भाषणानंतर अशोक चव्हाण यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून या संदर्भात आपले मत मांडले. `पंतप्रधानांचा आंदोलनजीवी हा शब्द अजिबात स्वीकारार्ह नाही, या शब्दांतून आंदोलनवार जगणारा असा अर्थ ध्वनीत होतो. हो उपरोधिक शब्द शेतकरी आंदोलना बाबत वापरला गेला. पण शेतकरी हा कोणाताही जीवी नाही, तर मानवतेला जीवीत ठेवणारा महत्वपुर्ण घटक आहे, त्यांचा असा अवमान करणे निंदनीय आहे`, असे म्हटले आहे.

Edited By : Jagdish Pansaer

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख