मंत्री संदीपान भुमरे यांचा विजयी षटकार; पाचोड ग्रामपंचायतीवर सर्व १७ जागा जिंकत भगवा..

पाचोड ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस नव्हतीच, पण सोशल मिडिया, फेसबुकवरच ती निर्माण करण्यात आली होती. निकालाच्या दिवशी ते स्पष्ट होईल आणि शिवसेनेचे सर्व १७ उमेदवार विजयी होतील, हा त्यांचा दावा त्यांनी खरा करून दाखवला आहे. भुमरे यांनी एकाच वेळी भाजप, मनसे, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या चारही पक्षांना धूळ चारल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
Minister Sandipan Bhumre grampancyat news
Minister Sandipan Bhumre grampancyat news

औरंगाबाद ः राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी आपला शब्द खरा करून दाखवत पाचोड ग्रामपंचायतीवर सहाव्यांदा निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. भुमरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पॅनलचे सर्वच्या सर्व सदस्य विजयी झाले आहेत. भुमरे यांनी या निमित्ताने विजयी षटकार मारत विरोधकांना चारीमुंड्या चित केले आहे.

संदीपान भुमरे यांच्या गावची ग्रामपंचायत ते राखणार की मग विरोधक त्यांना धक्का देणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. शिवसेना विरुध्द भाजप, काॅंग्रेस, राष्ट्रवादी असे चित्र पाचोड ग्रामपंचायतीत निर्माण झाले होते. मात्र संदीपान भुमरे यांनी मतदानाच्या दिवशीच ही निवडणूक एकतर्फी होणार असल्याचे जाहीर केले होते. आमचे सतराचे सतरा उमेदवार निवडूण येतील आणि विरोधकांचे डिपाॅझीट जप्त होईल असा दावा देखील भुमरे यांनी केला होता.आज तो खरा ठरला असून शिवसेनेच्या पॅनलचे सर्व सतरा उमेदवार विजयी झाले आहेत.

संदीपान भुमरे महाविकास  आघाडीत कॅबिनेट मंत्री झाल्यानंतरची पाचोड ग्रामपंचायतीची ही पहिलीच निवडूणक होती. ही ग्रामपंचयात बिनविरोध होईल असा अंदाज वर्तवला जात होता. पण विरोधकांनी एकत्रितपणे भुमरे यांना टक्कर देण्याचा निर्णय घेत निवडणुकीत पॅनल उतरवले होते. पण गेली पंचवीस वर्ष आमदार आणि आता वर्षभरापासून मंत्री म्हणून काम करत असलेल्या भूमरे यांनी आपली मतदारसंघ आणि गावावर असलेली पकड सिद्ध केली आहे.

कुठल्याही परिस्थीत पाचोडची ग्रामपंचायत सहाव्यांदा जिंकायची आणि विरोधकांना धूळ चारायची यासाठी गेल्या महिनाभरापासून संदीपान भुमरे यांनी पाचोडमध्ये तळ ठोकला होता. गेल्या पंचवीस वर्षापासून या ग्रामपंचायतीवर भुमरे व त्यांच्या समर्थकांची सत्ता होती. आता गावकऱ्यांनी पुन्हा एकदा भुमरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत सर्वच उमेदवार निवडूण दिले आहेत.

पाचोड ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस नव्हतीच, पण सोशल मिडिया, फेसबुकवरच ती निर्माण करण्यात आली होती. निकालाच्या दिवशी ते स्पष्ट होईल आणि शिवसेनेचे सर्व १७ उमेदवार विजयी होतील, हा त्यांचा दावा त्यांनी खरा करून दाखवला आहे. भुमरे यांनी एकाच वेळी भाजप, मनसे, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या चारही पक्षांना धूळ चारल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com