काॅंग्रेसचा विरोध असतांनाही अमित देशमुख म्हणाले, संभाजीनगर..

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाशी संबंधित हा निर्णय असून याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकृत ट्विटर हॅन्डलवर एक पोस्ट टाकण्यात आली आहे. अमित देशमुख यांचे छायाचित्र असलेल्या या पोस्टमध्ये औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. काॅंग्रेसचा संभाजीनगर नावाला विरोध असतांना हा उल्लेख कसा करण्यात आला, याबद्दल आता उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
State Government Meeting disision news
State Government Meeting disision news

औरंगाबाद ः नाव बदलण्याने सर्वसामान्यांचा विकास होत नसतो, औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करणे हा काही किमान समान विकास कार्यक्रमाचा भाग नाही, त्यामुळे आमचा औरंगाबादच्या नामांतराला ठाम विरोध आहे, अशी स्पष्ट भूमिका काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी घेतली. पंरतु काॅंग्रसचे अमित देशमुख यांच्या वैद्यकीय शिक्षण खात्या संबंधी आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत जे निर्णय घेण्यात आले, त्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देतांना त्यात संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. आता यावरून नवाच वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे करावे, अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. या संदर्भात मार्च २०२० मध्ये विभागीय आयुक्तांकडून तसा प्रस्ताव देखील मागवण्यात आल्याची माहिती आहे. या संदर्भात औरंगाबाद दौऱ्यावर असलेले राज्याचे महसुल मंत्री तथा प्रदेश काॅंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या नामांतरला काॅंग्रेसचा ठाम विरोध असल्याचे जाहीर केले होते.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर काम करत आहे. शहराचे नाव बदलणे हा त्याचा भाग नाही. शहराचे नाव बदलून काय होते, त्याने सर्वसामान्यांचा विकास होतो का?  असा सवाल करत औरंगाबादचे संभाजीगनर करण्याचा प्रस्ताव जेव्हा मंत्रीमंडळ समन्वय समिती समोर येईल, तेव्हा काॅंग्रेसचा त्याला विरोध असेल, असेही थोरातांनी स्पष्ट केले होते. यावरून राज्यात अनेक प्रतिक्रिया देखील उमटल्या होत्या.

परंतु संभाजीनगरला काॅंग्रेसचा कडाडून विरोध असतांना देखील मंत्रीमंडळ बैठकीत काॅंग्रेसच्या खात्याशी संबंधित निर्णयांची माहिती देतांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यात औरंगाबादचा उल्लेख संभाजीगर असा करण्यात आला आहे. औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालायात १६५ अतिरिक्त खाटा तसेच ३६० पदांना मान्यता देण्यात आली आहे.

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाशी संबंधित हा निर्णय असून याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकृत ट्विटर हॅन्डलवर एक पोस्ट टाकण्यात आली आहे. अमित देशमुख यांचे छायाचित्र असलेल्या या पोस्टमध्ये औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. काॅंग्रेसचा संभाजीनगर नावाला विरोध असतांना हा उल्लेख कसा करण्यात आला, याबद्दल आता उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Edited  By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com