मराठवाड्यात शिवसेना ग्रामपंचायत निवडणुकीत ताकदीने मैदानात..

काॅंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मात्र फारसी उत्सकूता दिसत नाही. स्थानिक जिल्हाप्रमुख, माजी आमदारांवरच या निवडणुकीचा भार टाकण्यात आला आहे. त्यामुळे मतदान दोन दिवसांवर आलेले असतांना देखील काॅंग्रेस-राष्टवादीचे बडे नेते मराठवाड्यात फिरकलेले नाहीत. अशीच काहीशी अवस्था भाजपची देखील असल्याचे पहायला मिळाले आहे.
Shivsena Grampanchyat election news Aurangabad
Shivsena Grampanchyat election news Aurangabad

औरंगाबाद ः राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार धुमधडाक्यात सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर असल्याने जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेऊन आगामी जिल्हा परिषदा, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत भाजपला धक्का देण्याची रणनिती महाविकास आघाडीने आखली आहे. मराठवाड्यात शिवसेनेना ग्रामपंचायत निवडणुकीत पुर्ण ताकदीने उतरल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नेते आणि मराठवाड्यातील मंत्र्यांनी गावागावांत जाऊन प्रचार आणि स्थानिक शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बळ देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानूसार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे रोहयो मंत्री संदीपान भुमरे, महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत.

ग्रामपंचायत निवडणुका जरी पक्षाच्या चिन्हावर लढल्या जात नसल्या तरी स्थानिक गावांमध्ये पॅनल उभारून जे उमेदवार निवडणूक लढतात ते कुठल्या न कुठल्या राजकीय पक्षांशी बांधील असतातच. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी मारण्यासाठी सर्वच पक्ष शक्तीपणाला लावतात. औरंगाबाद विभागीतील ४१३४ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता.१५) रोजी मतदान होणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद जिल्हा व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेला चांगले यश मिळाले. औरंगाबाद जिल्ह्यात तर शिवसेनेचे चार आमदार निवडूण आले. त्यामुळे मंत्रीमंडळात देखील जिल्ह्याला एक कॅबिनेट व एक राज्यमंत्री पद मिळाले.

त्यामुळे सहाजिकच ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक सदस्य आणि सरपंच निवडूण आणण्याची जबाबदारी पक्षाने चंद्रकांत खैरे, सदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांच्यावर सोपवली आहे. संघटनात्मक जबाबदारीमध्ये संदीपान भुमरे यांच्याकडे उस्मानाबाद, बीडचे संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी आहे, तर सत्तार यांच्यांकडे हिंगोलीची जबाबदारी काही दिवसांपुर्वीच सोपवण्यात आली होती. ग्रामपंचायतीचे मतदान अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे खैरे, भुमरे आणि सत्तार यांनी मराठवाडा पिंजून काढला आहे. खैरे, लातूर, उस्मानाबाद तर भुमरे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. तर सत्तार हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत.

या दौऱ्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन ग्रामपंचायत निवडणुकीत हवी अससलेली मदत या नेत्यांकडून केली जात आहे. या निमित्ताने शिवसेनेची संघटनात्मक बांधणी देखील केली जात आहे. ग्रामीण भागात शिवसेनेला मिळणारा प्रतिसाद पाहता खैरे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनाच नंबर वन पक्ष ठरेल, असा दावा केला आहे.

काॅंग्रेस, राष्ट्रवादीचे नेते दिसेना..

शिवसेनेने ग्रामपंचायत निवडणुकीत आपली ताकद पणाला लावली आहे. त्यांचे नेते आणि काही मंत्री प्रचारासाठी बैठका घेत आहेत. पण महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काॅंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मात्र फारसी उत्सकूता दिसत नाही. स्थानिक जिल्हाप्रमुख, माजी आमदारांवरच या निवडणुकीचा भार टाकण्यात आला आहे. त्यामुळे मतदान दोन दिवसांवर आलेले असतांना देखील काॅंग्रेस-राष्टवादीचे बडे नेते मराठवाड्यात फिरकलेले नाहीत. अशीच काहीशी अवस्था भाजपची देखील असल्याचे पहायला मिळाले आहे.

औरंगाबाद विभागातील ४१३४ ग्रामपंचायतीपैकी औरंगाबाद-६१८, बीड-१२९, नांदेड-१०१५, उस्मानाबाद-४२८, परभणी-५६६, जालना-४७५, लातूर-४०८ व हिंगोली जिल्ह्यातील ४९५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com