मराठा आरक्षण प्रश्नी अशोक चव्हाणांकडून मुख्यमंत्र्यांच्या कामात खोडा : मेटेंचा आरोप - Maratha reservation issue: Ashok Chavan thwarts CM's work: Mete's allegation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

मराठा आरक्षण प्रश्नी अशोक चव्हाणांकडून मुख्यमंत्र्यांच्या कामात खोडा : मेटेंचा आरोप

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

आगामी काळातील महानगर पालिका, नगर पालिका नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका शिवसंग्राम लढविणार ; आ. मेटेंची घोषणा
 

औरंगाबाद : मराठा आरक्षण मुख्यमंत्र्यांच्या हातून होऊ द्यायचं नाही. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कामात आशोक चव्हाण आडकाठी निर्माण करत असून त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही. असा आरोप आमदार विनायकराव मेटे यांनी केला आहे. तर आगामी काळात होऊ घातलेल्या महानगर पालिका, नगर पालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका शिवसंग्राम लढविणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.  

औरंगाबाद येथे शनिवारी शिवसंग्राम संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. मेटे म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना मराठा आरक्षणाबाबत नियमित आढावा घेत असत. मात्र महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंत्रीमंडळातील त्यांचे सहकारी व्यवस्थित माहिती देत नाही. त्यामुळे मराठा आरक्षण बाबतीत अडचण निर्माण होत आहे.

ते दूर करण्याचे काम आम्ही करत आहोत. उप समतीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे मुख्यमंत्र्यांच्या कामात आडकाठी आणत असून त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायच नाही, असे वाटते, असा आरोप करतांनाच मेटेंनी आगामी काळात होऊ घातलेल्या महानगर पालिका, नगर परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायतीच्या निवडणुका शिवसंग्राम लढविणार असल्याची घोषणा केली.

लवकरच आपण महाराष्ट्रभर संघटन बांधणीसाठी दौरा करणार असून तरूणांवर जबाबदारी सोपवणार असल्याचे मेटेंनी या बैठकीत सांगितले. सामाजिक प्रश्नांसाठी भलेही नुकसान झाले तरी चालेल मात्र समाजाच्या प्रश्नांवर कायमच शिवसंग्राम आवाज उठवेल. समाज हितासाठी कधीही शिवसंग्राम तोडजोड करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख