SP सुनिल कडासने यांच्यासह 11 अधिकाऱ्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचं विशेष पदक

ही पारितोषिके मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या एकूण 15 जणांचा समावेश आहे.
SP सुनिल कडासने यांच्यासह 11 अधिकाऱ्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचं विशेष पदक
Maharashtras 11 police officers got Union Home Ministers Medal

नवी दिल्ली : उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशभरातल्या 152 पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांना केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे विशेष पदक जाहीर कऱण्यात आलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 11 अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यात चार महिला अधिकारीही आहेत. कडासने यांनी श्रीरामपूर येथे अतिरिक्त पोलीस अधिक्षक असताना केलेल्या दुहेरी खूनाच्या तपासासाठी हे पदक देण्यात आलेलं आहे. (Maharashtras 11 police officers got Union Home Ministers Medal)

पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण व्हावा तसेच उत्तम तपास कार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल घेतली जावी, या हेतूने 2018 साली केंद्र सरकारने हे पुरस्कार सुरू केले. ही पारितोषिके मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या एकूण 15 जणांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील 11, गोवा पोलिस दलातील 1 आणि गुजरातच्या पोलीस दलातील 6 अधिकाऱ्यांनी हे पदक मिळविले आहे. 

तसेच या मानकऱ्यांमध्ये मध्य प्रदेशातील 11, उत्तर प्रदेशातील 10, केरळ आणि राजस्थानातील प्रत्येकी 9, तामिळनाडू पोलीस दलातील 8 आणि बिहारचे 7, कर्नाटक आणि दिल्ली पोलिसांतील प्रत्येकी 6 आणि इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील पदकप्राप्त पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये 28 महिला पोलीस अधिकारी देखील समाविष्ट आहेत.

केंद्रीय गृह मंत्री पदकाने सन्मानित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांची नावे :

1. ममता लॉरेन्स डिसोझा, पोलिस निरीक्षक

2. पद्मजा अमोल बधे, सहायक पोलिस आयुक्त

3. अलका धीरज जाधव, सहायक पोलिस निरीक्षक

4. प्रिती प्रकाश टिपरे, सहायक पोलिस आयुक्त

5. राहुल धलसिंग बहूरे, सहायक पोलिस निरीक्षक

6. मनोहर नरसप्पा पाटील, पोलिस निरीक्षक

7. बाबूराव भाऊसो महामुनी, उपअधीक्षक

8. अजित राजाराम टिके, उपअधीक्षक

9. सुनिल शंकर शिंदे, पोलिस निरीक्षक

10. सुनिल देवीदास कडासने, पोलिस अधीक्षक

11. उमेश शंकर माने पाटील, उपअधीक्षक

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in