पिशोरमध्ये हर्षवर्धन, संजना जाधव यांना मर्यादित यश; राष्ट्रवादीची सरशी..

हर्षवर्धन जाधव यांनी ८ उमेदवार दिले होते, यापैकी त्यांचे ४ सदस्य निवडूण आले आहेत. तर संजना जाधव यांच्या ७ पैकी फक्त दोनच उमेदवारांना यश मिळाले. १७ सदस्य संख्या असलेल्या पिशोर ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला असून पुंडलीक डहाके यांच्या पॅनलला सर्वाधिक ७ जागा मिळाल्या आहेत. त्या खालोखाल हर्षवर्धन जाधव गट ५, राजु मोकासे गट ३ तर संजना जाधव गटाचे २ उमेदवार विजयी झाले आहेत.
harshvardhan jadhav  news from aurangabad
harshvardhan jadhav news from aurangabad

औरंगाबाद ः पुण्यातील वृद्ध दाम्पत्यांस मारहाण केल्याप्रकरणी तुरूंगवास भोगत असलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या पत्नी संजना जाधव पिशोर ग्रामपंचायतीमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. हर्षवर्धन जाधव यांच्या अनुपस्थितीत निवडणुकीची जबाबदारी त्यांचे चिरंजीव आदित्य जाधव यांनी सांभाळली होती. मात्र पिशोरकरांनी या दोघांच्या पदरात मर्यादित यश टाकले आहे.१७ पैकी हर्षवर्धन जाधव गटाला ४, तर संजना जाधव यांच्या पॅनलला केवळ दोन जागा जिंकता आल्या आहेत. इथे राष्ट्रवादी काॅंग्रेस प्रणित पुंडलीक डहाके यांच्या पॅनलला सर्वाधिक ७ जागा मिळाल्या आहेत. मात्र पॅनलचे प्रमुख डहाके यांना पराभव स्वीकारावा लागला.

हर्षवर्धन जाधव यांचे कथित मारहाण प्रकरण, पत्नी संजना जाधव यांच्याशी त्यांचा सुरू असलेला कौटुंबिक वाद या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी एकमेकांविरुद्ध दिलेले पॅनल यामुळे कधी नव्हे ती पिशोर ग्रामपंचायतीची निवडणुक राज्यभरात चर्चिली गेली. विशेष म्हणजे हर्षवर्धन जाधव तुरुंगात असतांना त्यांच्या ८ उमेदवारांची जबाबदारी त्यांच्या १७ वर्षाच्या आदित्य या मुलाने घेतली होती. आई विरुध्द मुलाचे पॅनल असा रंग देखील याला दिला गेला. पिशोर ही कन्नड तालुक्यातील एक महत्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते.

दहा वर्ष हर्षवर्धन जाधव आमदार असतांना त्यांचे या ग्रामपंचायतीवर वर्चस्व होते. परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जाधव यांचा झालेला पराभव, टोकाला गेलेले कौटुंबिक वाद यामुळे त्यांची तालुका आणि आपल्या गावावरील पकड देखील ढिली झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. विशेष म्हणजे जाधव पती पत्नीला १७ उमेदवारांचे संपुर्ण पॅनल उभे करण्या इतके उमेदवार देखील मिळाले नाही. ७-८ उमेदवारांवरच त्यांना समाधान मानावे लागले.

हर्षवर्धन जाधव यांनी ८ उमेदवार दिले होते, यापैकी त्यांचे ४ सदस्य निवडूण आले आहेत. तर संजना जाधव यांच्या ७ पैकी फक्त दोनच उमेदवारांना यश मिळाले. १७  सदस्य संख्या असलेल्या पिशोर ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला असून पुंडलीक डहाके यांच्या पॅनलला सर्वाधिक ७ जागा मिळाल्या आहेत. त्या खालोखाल हर्षवर्धन जाधव गट ५,  राजु मोकासे गट ३ तर संजना जाधव गटाचे २ उमेदवार विजयी झाले आहेत.

कन्नड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने हर्षवर्धन जाधव यांचा दारूण पराभव करत ही जागा पुन्हा खेचून आणली. परंतु पिशोर ग्रामपंचायत ताब्यात घेण्यात मात्र शिवसेनेला यश आले नाही. कुठल्याच एका पॅनल किंवा गटाला बहुमत गाठता आलेले नसल्यामुळे इथे त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com