नांदेड जिल्ह्यातील खैरगावच्या उमेदवाराचं चिन्ह मतदान यंत्रातून गायब; आज फेरमतदान

मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तब्बल चार तासानंतर ही धक्कादायक बाब समोर आली. मतदान यंत्रातून मतदान चिन्ह गायब झाल्याने ललिता घंटेवाड या उमेदवाराने थेट तहसीलदार यांच्याकडे रीतसर तक्रार केली. त्यावेळी तहसीलदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हा प्रकार झाल्याचे मान्य करत निवडणूक विभागाला पत्रव्यवहार केला आणि निवडणूक विभागाने लगेच या एका प्रभागासाठी पुन्हा निवडणुक घेण्याचा निर्णय घेतला.
Re-election grampanchyat news nanded
Re-election grampanchyat news nanded

नांदेड ः निवडणूक विभागाच्या गलथान कारभारामुळे  फेरमतदान घेण्याची नामुष्की या विभागावर आली आहे. नांदेड मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान यंत्रातून चक्क उमेदवाराचं  निवडणूक चिन्हच गायब असल्याचा धक्कादायक प्रकार घडला. नायगाव तालुक्यातील खैरगाव येथे हा प्रकार घडकीस आल्यानंतर आज रविवारी इथे एका जागेसाठी फेरमतदानाची प्रक्रिया पार पडत आहे.

नायगाव तालुक्यातील खैरगाव ग्रामपंचायतीचा वार्ड क्रमांक तीन हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या वार्डात एकुण ४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते, मात्र अपक्ष असलेल्या ललीता शंकरराव घंटेवाड यांच्या नावापुढे चिन्हच नव्हते. प्रत्यक्षात घंटेवाड यांना छताचा पंखा चिन्ह देण्यात आले होते. उमेदवार घंटेवाड यांनी हरकत घेतल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याच्या हा प्रकार लक्षात आला. आता इथे फेरमतदान घेण्यात येत आहे.

जळगाव ग्रामपंचायत खैरगाव ग्रामपंचायत ९ सदस्य असून २० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. वार्ड क्रमांक तीन मधील 'क' मधून ललिता शंकरराव घंटेवाड यांनी अर्ज दाखल केला होता.  छाननीत तो अर्ज वैध ठरत निवडणूक विभागाने घंटेवाड यांना छताचा पंखा ही निवडणूक निशाणी दिली. त्यानुसार घंटेवाड यांनी स्वतःचे पंखा निशानी वर शिक्का मारा, असा प्रचार देखील केला.  मात्र, १५ रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत घंटेवाड यांच्या नावासमोर मतदान चिन्ह नसल्याचे समोर आले.

मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तब्बल चार तासानंतर ही धक्कादायक बाब समोर आली. मतदान यंत्रातून मतदान चिन्ह गायब झाल्याने ललिता घंटेवाड या उमेदवाराने थेट तहसीलदार यांच्याकडे रीतसर तक्रार केली. त्यावेळी तहसीलदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हा  प्रकार झाल्याचे मान्य करत निवडणूक विभागाला पत्रव्यवहार केला आणि निवडणूक विभागाने लगेच या एका प्रभागासाठी पुन्हा निवडणुक घेण्याचा निर्णय घेतला. 

त्यानुसार रविवारी सकाळी पुन्हा मतदानाची प्रक्रिया सुरू झाली सकाळपासून मतदार मतदानासाठी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावत आहेत. खैरगावच्या ग्रामस्थांनी  प्रशासनाला सहकार्य करण्याचे ठरवून फेर निवडणुकीला परवानगी दिली. आता मतदान प्रक्रिया शांततेत होत असून  केवळ निवडणूक विभागाच्या गलथान कारभारामुळे फेरमतदानाची वेळ आली आहे.  दरम्यान, निवडणूक अधिकारी या गलथान कारभारास कुणाला कारणीभूत धरतात आणि कुणावर कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com