Mla Santosh Bangar news Hingoli
Mla Santosh Bangar news Hingoli

सगळ्या रुग्णवाहिका जमा करून जाळून टाकीन;आमदार बांगर का भडकले?

मी बोलुन देखील अर्धा - एक तास रुग्णवाहिका पाठवल्या जात नाही, याद राखा यापुढे असे वागाल, तर तुमच्या सर्व रुग्णवाहिका हिंगोलीच्या गांधी चौकात आणून जाळून टाकू असा, सज्जड दमच मग बांगर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून भरला. संतोष बांगर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्याचांगलाच व्हायरल होतोयं.

हिंगोली ः लोकप्रतिनिधी आक्रमक का होतात? असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. पण कधीकधी हा आक्रमकपणा प्रसाशकीय व्यवस्थेचा हलगर्जीपणा, दिरंगाईमुळेही असतो. असाच काहीसा प्रकार आणि अनुभव कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या बाबतीत घडला आणि सगळ्या रुग्णवाहिका एका चौकात जमा करून जाळून टाकण्याचा गर्भीत इशारा त्यांनी दिला. गरज असेल तेव्हा रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका मिळत नसल्याने  बांगर यांनी हा संताप व्यक्त केला.

ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीची रुग्णसेवा मिळावी यासाठी केंद्र सरकार व राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने १०८,१०२ रुग्णवाहिकेची सेवा एका फोन काॅलवर उपलब्ध करून देण्यात आली आहेे. गरोदर महिला, रस्ते अपघात, ज्येष्ठ नागरिक व इतर गंभीर आजारपणात ही रुग्णवाहिकेची सेवा देश व राज्यातील रुग्णांना जीवनदान देणारी देखील ठरली आहे. पण अनेकदा वारंवार फोन करून रुग्णवाहिका वेळेत न येणे आणि त्यामुळे गरोदर महिला किंवा तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना याचा फटका देखील बसला आहे.

शिवसेना आमदार संतोष बांगर यांना त्यांच्या मतदारसंघात असाच काहीसा अनुभव आला आणि त्यांचा संयम ढळला. जिल्ह्यात सरकारच्यावतीने पुरेशा रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या असताना देखील रुग्णांना त्या वेळेवर उपलब्ध होत नाही, अशी तक्रार व खंत बांगर यांनी जाहीर कार्यक्रमातून बोलून दाखवली. मतदार संघातील नागरिक मला वारंवार फोन करतात. त्यानंतर मला तुमच्या व्यवस्थापनाशी रुग्णवाहिका पाठवण्यासाठी बोलावं लागतं,

मी बोलुन देखील अर्धा - एक तास रुग्णवाहिका पाठवल्या जात नाही, याद राखा यापुढे असे वागाल, तर तुमच्या सर्व रुग्णवाहिका हिंगोलीच्या गांधी चौकात आणून जाळून टाकू असा, सज्जड दमच मग बांगर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून भरला. संतोष बांगर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोयं. बांगर यांच्या या आक्रमक पावित्र्यांचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. बांगर यांच्या या इशाऱ्यानंतर तरी रुग्णवाहिका व्यवस्थापन सुधारणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com