वर्क ऑर्डरशिवाय मी कुठल्याही कामाचे भूमीपुजन करत नाही.. - I don't worship any work without work order. | Politics Marathi News - Sarkarnama

वर्क ऑर्डरशिवाय मी कुठल्याही कामाचे भूमीपुजन करत नाही..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 24 जानेवारी 2021

विकासकामांच्या निधीसाठी मी मंत्र्यांचा पायाही पडतो, मला त्यात काही वावगं वाटत नाही. शेवटी तुम्ही मला निवडणून दिलं ते मजा मारण्यासाठी, गोवा, मुंबईला जाण्यासाठी नाही, तर गोरगरिबांचे कामे करून मतदारसंघाच्या विकासासाठी, याची जाणीव मला आहे. इतरांसारख फक्त यायचं उद्धाटन, भुमीपूजन करून निघून जायचं आणि कामाचा मात्र पत्ताच नाही, असे माझे काम नाही.

औरंगाबाद ः नुसंत यायचं, उद्धाटन, भुमीपूनज करायचं अन् कामाचा पत्ताच नाही, असं आपलं काम नाही. मी वर्क ऑर्डर शिवाय कुठल्याही कामाचे भूमीपुजन करत नाही, असा स्पष्टवक्तेेपणा शिवसेनेचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी दाखवला. तुमच्यामुळे मला जीवनदान मिळाले आहे, त्यामुळे आता आमदारकीचा सगळा वेळ तुमची कामं करण्यासाठीच घालवणार असल्याची ग्वाही देखील राजपुत यांनी दिली.

कन्नड-सोयगावचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत मनमिळावू आणि साधेसरळ व्यक्तीमत्व म्हणून तालुक्यात परिचित आहेत. २० वर्षाच्या प्रयत्नानंतर तालुक्यातील मतदारांनी त्यांच्या पदरात आमदार होण्याची संधी टाकली. त्याबद्दल उदयसिंह राजूपत आपल्या भाषणातून नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत असतात. मतदरासंघातील एक गावातील रस्त्याच्या कामाचे भूमीपुजन आज त्यांनी केले.

यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी आपल्याला वीस वर्षानंतर का होईना, आमदार केल्याबद्दल उपस्थितांचे आभार मानले. राजपुत म्हणाले, लोक ६० वर्षाचे झाले की निवृत्त होतात, पण माझे काम वयाच्या ४९ व्या वर्षी खऱ्या अर्थाने सुरू झाले आहे. वीस वर्ष मी निवडणूक लढवली, हरलो एखाद्या व्यक्ती असतात तर आयुष्यातून उठला असता, पण तुम्ही मला जीवनदान दिले. आमदार झाल्यावर पहिले वर्ष कोरोनाशी लढा देण्यात गेले. त्यामुळे फारशी विकासकामे करता आली नाही. पण आता वेगाने काम हाती घेतली आहे.

तुमच्यासाठी मंत्र्यांच्या पायाही पडतो..

तुमच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहे, मला याची जाणीव आहे. मलाही आता तुमच्यासाठी काय करू काय नको, असे झाले आहे. त्यामुळे पायाला भिंगरी लावून मी मतदारसंघ, मुंबई, मंत्रालय, विधानभवन आणि मंत्र्यांचे बंगले पालथे घालत असतो. मतदारसंघातील लोकांना रस्ते, पाणी, दिवे, चांगले  आरोग्य, रोजगार, पर्यटन या सगळ्यासाठी जे काही करावे लागलं ते करतो.

विकासकामांच्या निधीसाठी मी मंत्र्यांचा पायाही पडतो, मला त्यात काही वावगं वाटत नाही. शेवटी तुम्ही मला निवडणून दिलं ते मजा मारण्यासाठी, गोवा, मुंबईला जाण्यासाठी नाही, तर गोरगरिबांचे कामे करून मतदारसंघाच्या विकासासाठी, याची जाणीव मला आहे. इतरांसारख फक्त यायचं उद्धाटन, भुमीपूजन करून निघून जायचं आणि कामाचा मात्र पत्ताच नाही, असे माझे काम नाही. वर्क ऑर्डर शिवाय मी भुमीजूपन करतच नाही, याचा पुनरुच्चार देखील उदयसिंह राजपूत यांनी केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख