पुणे, मुंबई प्रमाणेच औरंगाबादेतील शासकीय डाॅक्टर्सना कोवीड भत्ता द्या.. - Give Covid allowance to government doctors in Aurangabad like Pune, Mumbai | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

पुणे, मुंबई प्रमाणेच औरंगाबादेतील शासकीय डाॅक्टर्सना कोवीड भत्ता द्या..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 20 जानेवारी 2021

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आख्यारित येणार्‍या आंतरवासित (इंटर्न) डॉक्टरांना ११ हजार विद्यावेतन व ३९ हजार रुपये कोविड भत्ता असे एकूण दरमहा ५० हजार रुपये दिले जात आहे.  तर पुण्यातील बी.जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रूग्णालयातील आंतरवासिता (इंटर्न) डॉक्टरांना ११ हजार. विद्यावेतन व १९ हजार कोविड भत्ता असे एकूण दरमहा ३० हजार रुपये मानधन देण्यात येत आहे.

औरंगाबाद : कोरोनाच्या संकट काळात आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करणार्‍या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील आंतरवासिता (इंटर्न) डॉक्टरांना प्रोत्साहनपर (कोविड भत्ता) मानधन द्यावे, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली. आज या संदर्भातील निवदेन त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे दिले.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढत असताना देखील औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात काम करणारे आंतरवासिता (इंटर्न) डॉक्टरांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून कोविड रूग्णांची सेवा करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. अनेक ठिकाणी तर आंतरवासिता (इंटर्न) डॉक्टरांना ‘डबल ड्युटी’ करावी लागत आहे.

मात्र असे असताना देखील सद्यस्थितीत औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात काम करणार्‍या आंतरवासिता (इंटर्न) डॉक्टरांना केवळ ११ हजार रुपये विद्यावेतन दिले जात आहे, जे की खूप तुटपुंजे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आख्यारित येणार्‍या आंतरवासित (इंटर्न) डॉक्टरांना ११ हजार विद्यावेतन व ३९ हजार रुपये कोविड भत्ता असे एकूण दरमहा ५० हजार रुपये दिले जात आहे. 

 तर पुण्यातील बी.जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रूग्णालयातील आंतरवासिता (इंटर्न) डॉक्टरांना ११ हजार. विद्यावेतन व १९ हजार कोविड भत्ता असे एकूण दरमहा ३० हजार रुपये मानधन देण्यात येत आहे. मग औरंगाबादेतील डाॅक्टरांवरच अन्याय का? असा सवाल सतीश चव्हाण यांनी निवेदनात उपस्थित केला आहे.  

आम्हाला देखील त्याच प्रमाणे कोविड भत्ता देण्यात यावा, अशी मागणी औरंगाबादसह राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात काम करणारे आंतरवासिता (इंटर्न) डॉक्टरांनी केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या अधिष्ठातांनी तसा प्रस्ताव देखील १५ जानेवारी २०२१ रोजी संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.

राज्यातील शासकीय वैद्यकीय रूग्णालयात काम करणार्‍या आंतरवासिता (इंटर्न) डॉक्टरांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना देखील १ जून २०२० पासून प्रोत्साहनपर (कोविड भत्ता) मानधन देण्यात यावे, अशी मागणी देखील सतीश चव्हाण यांनी केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख