परळीत, अंबाजाोगाईत धनंजय मुंडेचाच आवाज; १२ पैकी १० ग्रामपंचायती राष्ट्रवादीने जिंकल्या

१२ ग्रामपंचायत निवडणुकीत १० ग्रामपंचतींमध्ये एकहाती विजय मिळवत परळी मतदारसंघातील जनता धनंजय मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे या निकालांवरून पुन्हा एकदा दिसून आले आहे.
minister dhnanjay munde  news parali
minister dhnanjay munde news parali

परळी : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे परळी मतदारसंघात पुन्हा एकदा एकेरी वर्चस्व सिद्ध करणारे ग्रामपंचायत निकाल हाती आले आहेत. मतदारसंघातील परळी व अंबाजोगाई तालुक्यातील एकूण १२ ग्रामपंचायतींची या पहिल्या टप्प्यात निवडणूक होती, त्यापैकी १० ग्रामपंचायतीत धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. तर उर्वरित २ ठिकाणी संमिश्र निकाल आले आहेत. 

परळी तालुक्यातील रेवली व वंजारवाडी या दोन तर अंबाजोगाई तालुक्यातील मूर्ती, वाकडी व हनुमंतवाडी या ३ अशा एकूण ५ ग्रामपंचायती आधीच बिनविरोध निवड करण्यात धनंजय मुंडे यांना यश आलेले आहे.

त्यानंतर झालेल्या उर्वरित गावांमधील निवडणुकीत परळी तालुक्यातील लाडझरी, मोहा, गडदेवाडी, सरफराजपुर या ४ गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली असून भोपळा ही एकमात्र ग्रामपंचायत भाजपला राखण्यात यश आले आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील एकूण ५ पैकी मूर्ती, वाकडी व हनुमंतवाडी या तीन ग्रामपंचायती बिनविरोध राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या असून अंबलवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचेच दोनही पॅनल विजयी झाले आहेत. तर दत्तपुर ७ पैकी २ उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आहेत.

दरम्यान १२ ग्रामपंचायत निवडणुकीत १० ग्रामपंचतींमध्ये एकहाती विजय मिळवत परळी मतदारसंघातील जनता धनंजय मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे या निकालांवरून पुन्हा एकदा दिसून आले आहे.

या सर्व विजयी उमेदवारांनी गुलाल उधळत धनंजय मुंडे यांच्या जगमित्र या संपर्क कार्यलयात विजयी जल्लोष केला. सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे जि. प. गटनेते अजय मुंडे यांनी हार घालून व पेढे भरवून अभिनंदन केले.तसेच सर्व विजयी उमेदवारांचे धनंजय मुंडे, जि. प. अध्यक्षा  शिवकन्या सिरसाट, संजय दौंड, वाल्मिक अण्णा कराड यांनीही अभिनंदन केले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com