राज्यातील जनतेची कोरोना निर्बंधातून होणार सुटका; राजेश टोपेंची मोठी घोषणा

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील जनतेची कोरोना निर्बंधातून होणार सुटका; राजेश टोपेंची मोठी घोषणा
Corona restrictions in the state relaxed says Rajesh Tope

मुंबई : मागील काही महिन्यांपासून कोरोना संकटामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध घालण्यात आले होते. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने आता हे निर्बंध टप्प्याटप्याने शिथील केले जात आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी महत्वाच्या घोषणा करत राज्यातील जनतेला दिलासा दिला आहे. स्वातंत्र्य दिनापासून संपूर्ण राज्यातील अनेक निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. (Corona restrictions in the state relaxed says Rajesh Tope)

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यानुसार अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. धार्मिक स्थळे मात्र बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास टास्क फोर्सचा विरोध आहे. आज रात्री मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीत त्याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केलं.

टोपे यांनी केलेल्या घोषणा :

- राज्यातील हॉटेल, रेस्टॉरन्स, मॉल रात्री दहा पर्यंत सुरू राहणार

- मंगल कार्यालयात 100 जणांच्या उपस्थितीला परवानगी

- खुल्या प्रांगणातील विवाहसोहळ्यांसाठी 200 जणांची मर्यादा

- हॉटेल, रेस्टॉरन्टमध्ये 50 टक्के उपस्थितीची मर्यादा

- सर्व दुकाने रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

- धार्मिक स्थळे, नाट्यगृह, चित्रपट गृह पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार

- मॉलमध्ये  प्रवेशासाठी दोन डोस घेतलेले असणं बंधनकारक

- लोकलसाठी मासिक व त्रैमासिक पास देण्याच्या सुचना

- इनडोअर खेळांना सुरू ठेवण्यास परवानगी

- खासगी कार्यालयांना 24 तास काम सुरू ठेवण्यास मान्यता. 25 टक्के उपस्थितीत काम करण्याच्या सुचना

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in