कोरोनामुळे कुटुंब संस्थेचे महत्व अन् माणुसकीची भावना वाढीस लागली- रोहित पवार - Corona increased the importance of family organization and the feeling of inhumanity - Rohit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

कोरोनामुळे कुटुंब संस्थेचे महत्व अन् माणुसकीची भावना वाढीस लागली- रोहित पवार

पांडुरंग उगले
रविवार, 17 जानेवारी 2021

आपण प्रातिनिधीक स्वरुपात कोरोना योद्धयांचा सन्मान करत असलो तरी अनेकांनी जीवाची पर्वा न करता दुसऱ्यांची मदत केली आहे. यापूर्वी सुप्रिया सुळे, अजित पवार माजलगाव पत्रकार संघाच्या कार्यक्रमासाठी आले होते, आज मी आलो आहे. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुढच्या वर्षी या कार्यक्रमासाठी आणण्यासाठी मी प्रयत्न करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

माजलागांव : कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग हादरले, पण या काळातील लॉकडाऊन व या जागतिक महामारीमुळे कुटुंब संस्थेचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. कोरोनामुळे समाजात माणुसकीची भावना वाढीस लागल्याचेही ते म्हणाले. माजलगांव येथे आयोजित कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

कोरोना वॉरियर्स डॉक्टर, सरकारी कर्मचारी, सामाजिक संघटना, पोलिस यंत्रणा यांनी केलेल्या कार्याचे महत्व जाणून माजलगाव पत्रकार संघाने त्यांचा सन्मान केला हे खरोखरच कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले. मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न माजलगाव पत्रकार संघातर्फे शनिवारी (ता. १६) आयोजित दर्पण, कोरोना योद्धा पुरस्कार वितरण कार्यक्रम रोहित पवार यांच्या हस्ते पार पडला.

आमदार प्रकाश सोळंके, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक डक माजी आमदार मोहनराव सोळंके, राधाकृष्ण होके पाटील, राजेंद्र जगताप, भाजप नेते रमेश आडसकर, नगराध्यक्ष शेख मंजूर, सभापती जयसिंह सोळंके यांची यावेळी उपस्थिती होती.

रोहित पवार म्हणाले, आपण प्रातिनिधीक स्वरुपात कोरोना योद्धयांचा सन्मान करत असलो तरी अनेकांनी जीवाची पर्वा न करता दुसऱ्यांची मदत केली आहे. यापूर्वी सुप्रिया सुळे, अजित पवार माजलगाव पत्रकार संघाच्या कार्यक्रमासाठी आले होते, आज मी आलो आहे. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुढच्या वर्षी या कार्यक्रमासाठी आणण्यासाठी मी प्रयत्न करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग हादरले, पण या काळातील लॉकडाऊन व या जागतिक महामारीमुळे कुटुंब संस्थेचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. कोरोनामुळे समाजात माणुसकीची भावना वाढीस लागल्याचेही ते म्हणाले. तर प्रकाश सोळंके यांनी पत्रकारांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

यांचा झाला गौरव..

पत्रकार तुकाराम येवले यांचा दर्पण पुरस्काराने तर सुरेश साबळे, डॉ. गजानन रुद्रवार, डॉ. अनिल परदेशी, डॉ. यशवंत राजेभोसले, डॉ. श्रेयेस देशपांडे, डॉ. स्नेहल जाधव, डॉ. पूजा देशमुख,टेंबे गणेश मंडळ युवा ग्रुप, राजेश्री, राजेंद्र आनंदगावकर व मंजरथ ग्रामस्थ, सुरेंद्र रेदासनी, रियाज काझी, शेख बाबा, एकनाथ मस्के, शाम देशमुख, अझहर नाईक, नितीन क्षीरसागर यांच्यासह, नगर परिषद, तहसील कार्यालय, पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, शहर पोलीस ठाणे, ग्रामीण पोलीस ठाणे यांनाही विशेष सन्मानाने गौरविण्यात आले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख