भाजपचा दावा खोटा, ते खालून नंबर वन : सत्तारांचा टोला - BJP's claim is false, it is number one below: Sattar | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचा दावा खोटा, ते खालून नंबर वन : सत्तारांचा टोला

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 20 जानेवारी 2021

ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला होता. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीची सरशी झाल्याचे पहायला मिळाले. यातही शिवसेना- राष्ट्रवादीकडून आमचेच सदस्य सर्वाधिक निवडूण आल्याचे दावे केले गेले.

औरंगाबाद ः नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोणता पक्ष नंबर एकचा ठरला यावरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने तीन पक्षांच्या विरोधात लढून देखील ग्रामीण जनतेने आम्हालाच पसंती दिली, आम्हीच नंबर वन आहोत असा दावा केला आहे. तर इकडे सत्ताधारी शिवसेना-राष्ट्रवादीकडून देखील आम्हीच नबंर वनचे दावे केले जातायेत. शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपचा दावा मात्र खोडून टाकला आहे. शिवसेना राज्यात नंबर वन असून भाजप खालून नंबर वन असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला होता. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीची सरशी झाल्याचे पहायला मिळाले. यातही शिवसेना- राष्ट्रवादीकडून आमचेच सदस्य सर्वाधिक निवडूण आल्याचे दावे केले गेले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दावा केल्यानंतर शिवसेनेकडून देखील आकडेवारी पुढे केली गेली. तर तिकडे फडणवीसांनी तीन्ही पक्षांच्या विरोधात लढून देखील आमचाच पहिला क्रमांक असल्याचा दावा केला. यावरून आता कुरघोडी आणि कलगितुरा सुरू झाला आहे.

शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना शिवसेनाच ग्रामपंचायत निवडणुकीत नंबर एकचा पक्ष ठरल्याचा दावा केला. तर भाजपचा खालून नंबर एक असल्याचा टोला देखील लगावला. हे सांगत असतांनाच सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोणत्या पक्षाचा किंवा विचारसरणीचा सरंपच होतो, त्यानंतरच ती ग्रामपंचयात कुणाच्या ताब्यात आली हे स्पष्ट होईल हे सांगायला देखील सत्तार विसरले नाहीत.

भाजपला ग्रामीण भागातील जनतेने नाकारले असून चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे यांच्या सारख्या नेत्यांना आपल्याच गावात आणि मतदारसंघात धक्के पचवावे लागले आहेत. त्यामुळे भाजप एक नाही तर तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर असेल, असा चिमटा देखील सत्तार यांनी काढला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख