अन् बाभळगांवला वकील सरपंच मिळाला...

वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी १९७४ मध्ये बाभळगांव ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या, आणि विलासरावांनी ग्रामपंचायत लढवावी, असा आग्रह गावातून होऊ लागला. उच्चशिक्षित, तरुण, उत्कृष्ट वक्तृत्व असलेल्या विलासरांवा सारखा चेहरा गावाच्या विकासात उजवा ठरेल, असा विश्वास गावकऱ्यांना होता. साडेतीनशे मतदार असलेल्या एका वार्डातून विलासराव आणि दुसऱ्या वार्डातून त्यांचे बंधू दिलीपराव हे दोघे एकाच वेळी ग्रामपंचायत निवडणुकीत उतरले.
Let Vilasrao Deshmukh grampanchyat memoery news
Let Vilasrao Deshmukh grampanchyat memoery news

औरंगाबाद ः ग्रामपंचायत सदस्य, सरपंच म्हणून काम केलेले अनेकजण पुढे राज्य व केंद्राच्या राजकारणात शिखरावर पोहचले. अशा काही निवडक नेत्यांच्या यादीत माजी मुख्यमंत्री दिवगंत विलासराव देशमुख यांचे नाव आवर्जून घेतले जाते. एलएलबीचे शिक्षण पुर्ण करून लातूरमध्ये वकिली करणाऱ्या विलासरावांच्या राजकारणाचा श्रीगणेशा देखील ग्रामपंचायत निवडणुकीपासूनच झाला. वकिली करत असतांना निवडणुका लागल्या आणि विलासराव त्यांचे बंधु दिलीप या दोघांनी एकाच वेळी बाभळगांवची ग्रामपंचायत निवडणूक लढवली. दोघेही निवडूण आले आणि विलासराव देशमुखांना सरपंच पदाचा मान मिळाला, पहिल्यांदा बाभळगावला वकील सरपंच मिळाला होता.

लातूर जिल्ह्यातील बाभळगांवची देशमुख गढी पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. विलासरावांचे वडील दगडोजी देशमुख यांनी पंधरा वर्ष बाभळगांवचे सरपंच म्हणून गावगाडा चालवला. सामाजिक सलोखा आणि सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची परंपरा पुढे राजकारणात आलेल्या त्यांच्या विलासराव आणि दिलीपराव या दोन्ही मुलांनी पुढे सुरू ठेवली. आता देशमुखांच्या तिसऱ्या पिढीतील अमित आणि धीरज देशमुख हे दोखील ती परंपरा पुढे घेऊन जात आहेत. विलासराव देशमुख यांच्या पहिल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या आठवणींना त्यांचे जिवलग मित्र उल्हासदादा पाटील यांनी `सरकारनामा`शी बोलतांना उजाळा दिली. 

उल्हास पवार म्हणाले, विलासराव देशमुखांनी पुणे विद्यापीठातून बीएससी आणि नंतर कायद्याची पदवी घेतली. काही वर्ष पुण्यात आणि त्यानंतर गावाची ओढ म्हणून त्यांनी लातूरला जाऊन वकीली सुरू केली.  वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी  १९७४ मध्ये  बाभळगांव ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या, आणि विलासरावांनी ग्रामपंचायत लढवावी, असा आग्रह गावातून होऊ लागला. उच्चशिक्षित, तरुण, उत्कृष्ट वक्तृत्व असलेल्या विलासरांवा सारखा चेहरा गावाच्या विकासात उजवा ठरेल, असा विश्वास गावकऱ्यांना होता. साडेतीनशे मतदार असलेल्या एका वार्डातून विलासराव आणि दुसऱ्या वार्डातून त्यांचे बंधू दिलीपराव हे दोघे एकाच वेळी ग्रामपंचायत निवडणुकीत उतरले.

अनुसूचित जाती, दलित व गरीब, सर्वसामान्यांची संख्या अधिक असलेल्या वार्डातून विलासराव मताधिक्याने निवडूण आले आणि सरंपच म्हणून विराजमान झाले. पुढे त्यांनी आपल्या अनेक भाषणात  ग्रामपंचायत निवडणुकीतून आपल्याला राष्ट्रीय स्तराच्या सामाजिक सलोख्याचा अनुभव आल्याचे सांगितले. तीन वर्ष सरपंच म्हणून गावाचा कारभार पाहिल्यानंतर त्यांना पंचायत समितीचा उपसभापती होण्याचा मान मिळाला. उपसभापती असून देखील त्यांना सभापती पदाचे सर्व अधिकार बहाल करण्यात आले होते. उपसभापती म्हणून काम केल्यानंतर ते  जिल्हा परिषद सदस्य आणि  १९८० मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.

गढीवरून राष्ट्रीय भाषण..

बाभळगांवच्या गढीच्या पायथ्या महादेव आणि मारोती मंदिराजवळ दसऱ्याच्या वेळी होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनेक आठवणी विलासराव सांगायचे. दसरा मेळाव्याची पालखी, मिरवणूक झाल्यानंतर जेव्हा ते उपस्थितांना मार्गदर्शन करायेच, तेव्हा त्याला गंमतीने ते आमचे राष्ट्रीय भाषण तिथे व्हायचे असे म्हणायचे. पुढे १९८२ मध्ये  त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपद मिळाले.  आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या दोन वर्षात मंत्रिपद मिळालेल्या विलासरावांनी नंतर मागे वळून पाहिले नाही.

विलासराव सदैव मंत्रिमंडळात राहिले. शिक्षण, कृषि, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी सक्षमपणे केला. १९९९ ला विलासराव पहिल्यांदा आणि  २००४ च्या निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा  राज्याचे मुख्यमंत्री झाले. पण २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्याने त्यांना आपले मुख्यमंत्री पद गमवावे लागले. त्यानंतर २००९ मध्ये त्यांच्यावर केंद्रात अवजड उद्योग खात्याचे मंत्री म्हणून जबाबदारी आली. ग्रामविकासमंत्री आणि पंचायत खात्याचा अतिरिक्त कार्यभार देखील त्यांच्याचकडे होता. या शिवाय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री म्हणून काम करण्याची संधी देखील त्यांना मिळाली.

सरपंच ते केंद्रात मंत्री अस विलासरावांचा प्रदीर्घ राजकीय प्रवास झाला असला तरी लातूर आणि बाभळगांवशी असलेली त्यांची नाळ अखेरपर्यंत घट्ट होती. आपल्या राजकीय जीवनात बाभळगावच्या ग्रामपंचायतीचे महत्व खूप मोठे असल्याचे विलासराव नेहमी सांगायचे असेही उल्हास पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com