धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाने महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृतीला धक्का पोहोचला ..

धनंजय मुंडे यांचे पत्नी शिवाय आणखी एक महिलेशी असलेले संबंध उघड झालेले असतांना तिसऱ्या महिलेने त्यांच्यावर अत्याचाराचे आरोप करत पोलीसांमध्ये बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे जोपर्यंत या आरोपातून धनंजय मुंडे यांची मुक्तता होत नाही, तोपर्यंत त्यांना राज्याच्या मंत्रीमंडळात राहण्याचा अधिकार नाही.
Bjp Leader kirit somiya alligation to Dhnanjay munde news
Bjp Leader kirit somiya alligation to Dhnanjay munde news

औरंगाबाद ः राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने जे आरोप केले आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मिता आणि संस्कृतीला धक्का पोहचला आहे. या आरोपातून जोपर्यंत मुक्तता होत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीमंडळात राहण्याचा अजिबात अधिकार नाही, अशी टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर करूणा शर्मा यांच्या बहिण रेणू शर्मा यांनी अत्याचाराचे आरोप केले आहेत. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार सदर महिलेने दिली आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी स्वतः आपल्या फेसुबक अकांऊटवरून मोठा खुलासा केला आहे.

रेणू शर्मा व त्यांच्या सहमतीने संबंध होते आणि यातून त्यांना दोन मुले देखील असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आपल्या ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळण्यासाठी व मला बदनाम करण्यासाठी ही तक्रार करण्यात आल्याचा आरोपही मुंडे यांनी केला आहे. सदर महिलेच्या तक्रारीनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. भाजपने देखील धनंजय मुंडे यांना मंत्रीमंडळात राहण्याचा अधिकार नसल्याचेे म्हणत त्यांच्यावर तोफ डागली आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या संदर्भात एक व्हिडिओ जारी करत, धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचे आरोप झाल्याने महाराष्ट्राच्या संस्कृती आणि अस्मितेला धोका पोहचल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोमय्या आपल्या व्हिडिओमध्ये म्हणतात, धनंजय मुंडे यांचे पत्नी शिवाय आणखी एक महिलेशी असलेले संबंध उघड झालेले असतांना तिसऱ्या महिलेने त्यांच्यावर अत्याचाराचे आरोप करत पोलीसांमध्ये बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे जोपर्यंत या आरोपातून धनंजय मुंडे यांची मुक्तता होत नाही, तोपर्यंत त्यांना राज्याच्या मंत्रीमंडळात राहण्याचा अधिकार नाही, असेही सोमय्या यांनी म्हटले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com