आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून ३० टक्के रक्कम थेट त्यांच्या खात्यात

याबद्दल स्वतः जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सुनावणी घेतली. संबंधित कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानेया ११ कर्मचाऱ्यांच्या पगारातून ३० टक्के पगार कपात करून थेट आई-वडिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली. अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठा झटका बसला आहे.
Z.P. Latur news
Z.P. Latur news

लातूर ः जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी ११ नाेव्हेबर २०२० रोजी एक ठराव घेतला होता. जे अधिकारी-कर्मचारी आपल्या आई वडलांचा सांभाळ करत नाहीत, त्याच्या पगारातून ३० टक्के रक्कम कपात करून ती थेट त्यांचा आई-वडलांच्या खात्यात जमा करण्यात येईल. असा निर्णय घेणारी लातूरची जिल्हा परिषद ही दुसरी ठरली होती. केवळ ठराव घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष थांबले नाही, तर अशा अकरा तक्रारींचा निपटारा करत कर्मचाऱ्यांच्या पगारातून ३० टक्के रक्कम कपात करून त्यांच्या आई-वडलांच्या खात्यात देखील वर्ग करण्यात आली आहे.

लातूर जिल्हा परिषदेने  वृद्ध माता पित्यांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगारातून ३० टक्के रक्कम कपात करून आईवडिलांच्या खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय ११ नाेव्हेबरच्या सर्वसाधारण सभेत घेतला होता. त्यानंतर याबाबतीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्याकडे ११ प्रकरणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग व पंचायत विभागातील ११ कर्मचारी आपल्या आई-वडीलांचा सांभाळ करत नसल्याचे या तक्रारीवरून स्पष्ट झाले होते.

याबद्दल स्वतः जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सुनावणी घेतली. संबंधित कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने या ११ कर्मचाऱ्यांच्या पगारातून ३० टक्के पगार कपात करून थेट आई-वडिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली. अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठा झटका बसला आहे.

आपला मुलगा जीवनात मोठा व्हावा अशी अपेक्षा सर्वसाधारणपणे आईवडीलांची असते. प्रसंगी कर्जाचा बोझा करत मुलांना शिक्षण देत अनेक कष्ट आईवडील भोगत असतात. पण याच आईवडीलांना म्हातारपणी वृध्दाश्रमात पाठवले जाते.  हीच बाब लक्षात घेत लातूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारातून विशिष्ट रक्कम कपात करुन थेट आईवडिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

नाेव्हेंबरमध्ये झाला होता ठराव..

परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपाध्यक्षा भारतबाई साळूंके व अन्य विभागाचे सभापती या सभेला ऑनलाईन पद्धतीनेउपस्थित होते. जि.प. सदस्य मंचकराव पाटील यांनी आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून ३० टक्के रक्कम आई-वडीलाच्या खात्यात जमा करण्याचा विषय मांडला होता.  त्यास रामचंद्र तिरुके यांनी अनुमोदन दिले होते, तर सदस्य महेश पाटील यांनी हा ठराव का महत्त्वाचा आहे हे सभागृहास पटवून दिले होते.

त्यानंतर सर्वानुमते ठराव समंत करण्यात आला. यापूर्वी अहमदनगर जिल्हा परिषदेने असा ठराव घेतला होता. लातूर जिल्हा परिषद ही असा ठराव घेणारी राज्यातील दुसरी जिल्हा परिषद ठरली होती.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com