महाडिक आणि सतेज पाटलांनी दोघांनाही ठेंगा दाखवणारे हे कोण मतदार?

सहलीवर जाण्यास सभासदांना घरातून विरोध तर कार्यकर्त्यांवर नेत्यांचा दबाव अशी विचित्र अवस्था आहे. यात कार्यकर्त्यांची कोंडी होत आहे. गडहिंग्लज तालुक्‍याचेच उदाहरण घेतले तर 273 पैकी दोन्ही आघाडीकडून एकूण 80 ते 90 सभासदच नियोजित ठिकाणी पोहचल्याचे कळते. तरीही अखेरच्या घटकांपर्यंत अधिकाधिक सभासदांना पाठवून देण्याची धडपड कार्यकर्ते करीत आहेत.
Who are the voters who are supporting both Mahadik and Satej Patel?
Who are the voters who are supporting both Mahadik and Satej Patel?

गडहिंग्लज : गोकूळ दूध संघाची निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. दोन मे रोजी मतदान होत आहे. त्यासाठी आतापासूनच सत्तारुढ व विरोधी पॅनेलकडून ठरावधारक सभासदांना सहलीवर नेण्याच्या हालचाली वेगावल्या आहेत. परंतु, कोरोनाच्या धास्तीने गोकूळची सहल नको रे बाबा, अशा प्रतिक्रिया सभासदांतून येत आहेत. अनेकांकडून नकार घंटा मिळत असल्याने रिंगणातील दोन्ही बाजूच्या आघाड्यांना व उमेदवारांमध्ये धडकी भरली आहे.

गोकूळ निवडणुकीत सत्तारुढ पॅनेल विरोधात 'महाविकास'ची आघाडी रिंगणात आहे. दोन्हीकडील नेत्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने चुरशीचे वातावरण आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा धडधडत आहेत. मतदानाला आता दोनच दिवस शिल्लक राहिलेत. गोकूळची निवडणुकीची चाहूल लागताच मतांचा दर आणि सभासदांची ट्रीप याबद्दल मोठी उत्सुकता असते. फेटेधारी सभासदांना ट्रीपवरुन थेट मतदानासाठी आणताना गठ्ठा मतदानाचे शक्तीप्रदर्शन केले जाते. 

कोणाच्या बाजूने किती मतदार आले, यावरुन गोकूळच्या निकालाचा कल कळतो. यावेळी मात्र थेट नकार मिळत असून सभासद कोणाच्या बाजूने आहेत, हेच कळेनासे झाल्याने दोन्ही आघाड्यांमध्ये धडकी भरली आहे. यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील साडेतीन हजारावर सभासद मतदानास पात्र आहेत. चुरशीमुळे मतांचा दर लाखाच्या घरात तर काही काठावरील मतदारांसाठी 'खास पॅकेज'च्या पायघड्या घातल्याची चर्चा आहे.

मतदान अवघ्या दोन दिवसावर येवून ठेपल्याने आपापल्या सभासदांना ट्रीपवर नेण्यासाठी दोन्ही आघाडीकडून हालचाली वेगावल्या आहेत. त्यासाठी तालुका, गावपातळीवरील कार्यकर्त्यावर नेत्यांचा प्रेशर वाढला आहे.
वाहनांमध्ये बसवून सभासदांना नियोजित ठिकाणी पाठवून देण्याची कसरत सुरु आहे. सभासदांना ट्रीपवर पाठविण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना अक्षरश: घाम फुटत आहे. बहुतांश सभासद वाहनात बसण्यास नकार देत आहेत.

कोरोना संसर्ग हे त्याचे मुख्य कारण आहे. यामागच्या निवडणुकांत यथेच्छ सोय असणाऱ्या ट्रीपवर जाण्यासाठी रस्सीखेच पहायला मिळायची. यंदा मात्र चित्र उलटे आहे. सहलीवर जाण्यास सभासदांना घरातून विरोध तर कार्यकर्त्यांवर नेत्यांचा दबाव अशी विचित्र अवस्था आहे. यात कार्यकर्त्यांची कोंडी होत आहे. गडहिंग्लज तालुक्‍याचेच उदाहरण घेतले तर 273 पैकी दोन्ही आघाडीकडून एकूण 80 ते 90 सभासदच नियोजित ठिकाणी पोहचल्याचे कळते. तरीही अखेरच्या घटकांपर्यंत अधिकाधिक सभासदांना पाठवून देण्याची धडपड कार्यकर्ते करीत आहेत.

उपचाराच्या खर्चाची चिंता?

जिल्हा बंदी असल्याने जिल्ह्याबाहेर सभासदांना पाठविण्यात अडचणी आहेत. गोवाही पाच दिवस बंद आहे. या पार्श्‍वभूमीवर कोल्हापुरातच काही ठिकाण निवडून सभासदांना एकत्रित ठेवले जात असल्याची चर्चा आहे. एकाच ठिकाणच्या या समुहामुळे कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका आहे. यामुळे सभासद नकार देत असल्याचे कळते. दोन दिवसाची ट्रीप व्हायची आणि कोरोना झालाच तर उपचाराचा खर्च कोणी सोसायचा, हा प्रश्‍न सभासद विचारत आहेत. त्याला उत्तर मात्र मिळत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com