भाजप खासदारपुत्र-पदाधिकऱ्यातील वाद मिटला; खैरे तोंडघशी

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी हल्ला झालेले भाजपचे कुणाल मराठे यांची व त्यांच्या कुटुंबियाची घरी जाऊन नुकतीच भेट घेतली होती. यावेळी खासदारकीची शपथही न घेतलेल्या कराड यांची गुंडगिरी आतापासूनच सुरू झाली आहे का? मराठे याला न्याय मिळाल नाही, तर शिवसेना त्याचे संरक्षण करेल, असा इशारा देत या वादात उडी घेतली होती.
khaire-karad news aurangabad
khaire-karad news aurangabad

औरंगाबाद :भाजप खासदार डॉ. भागवत कराड यांचे पुत्र हर्षवर्धन कराड व भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते कुणाल मराठे यांच्यातील वादावर अखेर पडदा टाकण्यात भाजपच्या नेत्यांना यश आले. पण या प्रकरणात नाहक उडी घेत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मराठे यांची बाजू घेत शिवसैनिक त्यांच्या रक्षण करतील असे सांगत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पण भाजपने घरातील हे भांडण मिटवत गैरसमजातून हा प्रकार घडला होता. गैरसमज आता दूर झाले, असे सांगत कराड पुत्र हर्षवर्धन आणि कुणाल मराठे यांच्यात दिलजमाई घडवून आणली. त्यामुळे खैरे मात्र चांगलेच तोंडघशी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

भाजपचे खासदार भागवत कराड यांचे पुत्र हर्षवर्धन, वरुण आणि त्यांच्या अन्य साथीदार पवन सोनवणे यांनी काही दिवसांपुर्वी  भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी कुणाल मराठे याला त्याच्या घरात घुसून मारहाण केली होती. या प्रकरणी मराठे यांच्या तक्रारीवरून खासदार पुत्र हर्षवर्धन कराड, पवन सोनवणे यांच्यावर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप आणि खुलासे झाले. महापालिका निवडणुकी कोटला कॉलनीतून इच्छूक असलेले कराड यांचे चिरंजीव हर्षवर्धन यांनी कुणाल मराठे देखील वार्डात फिरत असल्याचे कळल्यानंतर त्याला धमकावत मारहाण केल्याचे पोलीसात दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी हल्ला झालेले भाजपचे कुणाल मराठे यांची व त्यांच्या कुटुंबियाची घरी जाऊन नुकतीच भेट घेतली होती. यावेळी खासदारकीची शपथही न घेतलेल्या कराड यांची गुंडगिरी आतापासूनच सुरू झाली आहे का? मराठे याला न्याय मिळाल नाही, तर शिवसेना त्याचे संरक्षण करेल, असा इशारा देत या वादात उडी घेतली होती. त्यावर भागवत कराड यांनी देखील खैरे यांच्यावर पलटवार करत, तुम्ही तुमच्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सांभाळले असते, तर लोकसभा निवडणुकीत पराभव झाला नसता असे म्हणत, खैरे यांच्या जखमेवर मीठ चोळले होते.

दरम्यान, पक्षांतगर्त नाराजी किंवा वाद चव्हाट्यावर आल्यामुळे भाजपची मोठी बदनामी झाली होती. आगमी महापालिकेच्या निवडणुका पाहता हे प्रकरण भाजपला परवडणार नाही हे लक्षात आल्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर, आमदार अतुल सावे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, माजी नगरसेवक प्रमोद राठोड यांनी मध्यस्ती करत या वादावर पडदा टाकला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com